युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सतराव्या आदिवासी युवा देवाणघेवाण उपक्रमाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्याची उपस्थिती
                    
                    
                        
2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत तरुण आदिवासी नेते महत्त्वाची भूमिका बजावतील: डॉ. मनसुख मांडवीय
                    
                
                
                    Posted On:
                30 OCT 2025 9:04PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                मुंबई, 30 ऑक्टोबर 2025
 
मुंबईतील मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात  सतरावा आदिवासी युवा देवाणघेवाण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या आणि महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या एकत्रित सहकार्याने आयोजित केलेल्या या  उपक्रमाचा आरंभ 27 ऑक्टोबर 2025 रोजी झाला असून 2 नोव्हेंबर 2025 रोजी तो समाप्त होईल.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आज झालेल्या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.

2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत तरुण आदिवासी नेत्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असेल, असे यावर  आदिवासी युवकांशी बोलताना केंद्रीय मंत्री डॉ. मांडवीय यांनी भर देऊन सांगितले. कौशल्य विकास आणि डिजिटल सक्षमीकरणाद्वारे "विकसित भारत" या देशाच्या दृष्टिकोनासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी तरुणांना केले.
मेरा युवा भारत पोर्टल’चे महत्त्व देखील मांडवीय यांनी अधोरेखित केले आणि तरुणांना या प्लॅटफॉर्मवर डिजिटल पध्दतीने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. हे पोर्टल नोकरीच्या संधी, कौशल्य विकास कार्यक्रम, ऑनलाइन स्पर्धा आणि उत्कृष्ट कार्याचे प्रदर्शन आणि विचार सामायिक करण्याचे मार्ग याबद्दल व्यापक माहिती प्रदान करते, ज्यामुळे तरुणांना विविध विषयांची माहिती होते  आणि कामात गर्क राहण्याची प्रेरणा मिळते.
 
  
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पोलिस प्रशिक्षण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ; माय भारत मुंबईचे जिल्हा युवा अधिकारी अनुप इंगोले; मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र दळवी आणि ज्युडो असोसिएशनचे यतीन बंगेरा यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा उपक्रम आदिवासी तरुणांना ज्ञान, कौशल्ये आणि सर्वांगीण विकासासाठी मदत करतो तसेच राष्ट्र उभारणीच्या कार्यात सक्रिय सहभागासाठी संधी देऊन सक्षम करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो.
 
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/संपदा पाटगावकर/दर्शना राणे
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2184401)
                Visitor Counter : 6