पंतप्रधान कार्यालय
महेंद्र सिंह मेवाड यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
10 NOV 2024 10:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2024
चित्तोडगडचे माजी खासदार महेंद्र सिंह मेवाड यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला आहे.
एक्स वर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी लिहिले की:
"सामाजिक आणि राजकीय जीवनात अमूल्य योगदान देणारे चित्तोडगढचे माजी खासदार आणि मेवाड राजघराण्याचे सदस्य महेंद्र सिंह मेवाड जी यांच्या निधनाने अतीव दुःख झाले आहे. राजस्थानचा वारसा जतन आणि समृद्ध करण्यासाठी ते आजन्म कार्यरत राहिले.
जनतेची सेवा करण्यासाठी त्यांनी संपूर्ण समर्पण भावनेने काम केले. सामाजिक कल्याणाप्रती त्यांचे कार्य नेहमीच प्रेरणास्रोत राहील. दुःखाच्या या प्रसंगी मी त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!”
* * *
आशिष सांगळे/संदेश नाईक/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183591)
Visitor Counter : 6
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam