अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनपीएस आणि यूपीएस योजनेअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  लाइफ सायकल 75 (एलसी 75) आणि बॅलन्स्ड लाइफ सायकल (बीएलसी) या पर्यायांचा विस्तार करायला केंद्र सरकारची मंजुरी

Posted On: 24 OCT 2025 6:35PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) आणि एकीकृत पेन्शन योजना (यूपीएस) या दोन्ही योजनांतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  एलसी 75 आणि बीएलसी, या दोन्ही गुंतवणूक पर्यायांच्या विस्ताराला मंजुरी  दिली आहे. बिगर-सरकारी सदस्यांप्रमाणे आपल्याला गुंतवणूक पर्यायांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करावी, अशी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी होती. त्याला अनुसरून हे पाऊल उचलण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती पश्चात नियोजनात लवचिकता वाढावी, तसेच त्यांना वैयक्तिक प्राधान्यक्रमानुसार आपल्या सेवानिवृत्ती निधीचे व्यवस्थापन करता यावे, या दृष्टीने हे पर्याय आखण्यात आले आहेत.

एनपीएस आणि यूपीएस अंतर्गत, केंद्र सरकारी कर्मचारी आता गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमधून आपली निवड ठरवू शकतील:

· डीफॉल्ट पर्याय: पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीएफआरडीए) ने वेळोवेळी निर्धारित केलेला गुंतवणुकीचा 'डिफॉल्ट पॅटर्न'.

· स्कीम जी: कमी जोखीम, निश्चित परताव्यासाठी सरकारी रोख्यांमध्ये 100% गुंतवणूक.

· एलसी -25: जास्तीत जास्त 25% समभाग गुंतवणूक, 35 ते 55 वर्षे वयोगटात हळूहळू कमी होत जाईल. (परिशिष्ट पहावे)

· एलसी -50: जास्तीत जास्त 50%  समभाग गुंतवणूक,  35 ते 55 वर्षे वयोगटात हळूहळू कमी होत जाईल. (परिशिष्ट पहावे)

· बीएलसी (संतुलित जीवन चक्र): एलसी 50 ची सुधारित आवृत्ती, वयाच्या 45 व्या वर्षापासून समभाग गुंतवणूक , जी  हळूहळू कमी होत जाईल, कर्मचाऱ्यांना इच्छा असेल, तर दीर्घ कालावधीसाठी समभाग गुंतवणूक करता येईल. (परिशिष्ट पहावे)

· एलसी75: जास्तीत जास्त 75% समभाग गुंतवणूक, 35 ते 55 वयोगटात हळूहळू कमी होत जाईल. (परिशिष्ट पहावे)

या निर्णयामुळे होणारा प्रमुख लाभ:

· अधिक लवचिकता आणि पर्याय : कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीची उद्दीष्टे आणि जोखीम प्राधान्यांना अनुकूल असे पर्याय निवडू शकतील.

· ग्लाइड पाथ यंत्रणा: वयानुसार समभाग गुंतवणूक आपोआप कमी होते-  वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत एलसी75 साठी 15% आणि बीएलसी साठी 35%- सेवानिवृत्ती जवळ येत असताना बाजारातील मोठ्या चढ-उतारांपासून संरक्षण सुनिश्चित करते.

· विस्तृत ऑटो चॉइस पर्याय: हा निधी सेवानिवृत्ती नियोजनासाठी अधिक वैविध्यपूर्ण पर्याय प्रदान करतो, आणि कर्मचाऱ्यांची जोखीम-परताव्याची विविध प्राधान्ये प्रतिबिंबित करतो.

· माहितीपूर्ण नियोजनाला समर्थन: कर्मचारी त्यांच्या वैयक्तिक जोखीम-परतावा प्राधान्यांनुसार त्यांच्या सेवानिवृत्ती बचतीची रचना करण्यासाठी या पर्यायांचा वापर करू शकतील.

परिशिष्ट:

लाइफ सायकल फंड्समध्ये मालमत्ता वाटप

 

Age

LC75

LC50

Balanced LC50

LC25

Up to 35 Years

E: 75%, C: 10%, G: 15%

E: 50%, C: 30%, G: 20%

E: 50%, C: 30%, G: 20%

E: 25%, C: 45%, G: 30%

36 Years

E: 71%, C: 11%, G: 18%

E: 48%, C: 29%, G: 23%

E: 50%, C: 30%, G: 20%

E: 24%, C: 43%, G: 33%

37 Years

E: 67%, C: 12%, G: 21%

E: 46%, C: 28%, G: 26%

E: 50%, C: 30%, G: 20%

E: 23%, C: 41%, G: 36%

38 Years

E: 63%, C: 13%, G: 24%

E: 44%, C: 27%, G: 29%

E: 50%, C: 30%, G: 20%

E: 22%, C: 39%, G: 39%

39 Years

E: 59%, C: 14%, G: 27%

E: 42%, C: 26%, G: 32%

E: 50%, C: 30%, G: 20%

E: 21%, C: 37%, G: 42%

40 Years

E: 55%, C: 15%, G: 30%

E: 40%, C: 25%, G: 35%

E: 50%, C: 30%, G: 20%

E: 20%, C: 35%, G: 45%

41 Years

E: 51%, C: 16%, G: 33%

E: 38%, C: 24%, G: 38%

E: 50%, C: 30%, G: 20%

E: 19%, C: 33%, G: 48%

42 Years

E: 47%, C: 17%, G: 36%

E: 36%, C: 23%, G: 41%

E: 50%, C: 30%, G: 20%

E: 18%, C: 31%, G: 51%

43 Years

E: 43%, C: 18%, G: 39%

E: 34%, C: 22%, G: 44%

E: 50%, C: 30%, G: 20%

E: 17%, C: 29%, G: 54%

44 Years

E: 39%, C: 19%, G: 42%

E: 32%, C: 21%, G: 47%

E: 50%, C: 30%, G: 20%

E: 16%, C: 27%, G: 57%

45 Years

E: 35%, C: 20%, G: 45%

E: 30%, C: 20%, G: 50%

E: 50%, C: 30%, G: 20%

E: 15%, C: 25%, G: 60%

46 Years

E: 32%, C: 20%, G: 48%

E: 28%, C: 19%, G: 53%

E: 48%, C: 28%, G: 24%

E: 14%, C: 23%, G: 63%

47 Years

E: 29%, C: 20%, G: 51%

E: 26%, C: 18%, G: 56%

E: 46%, C: 26%, G: 28%

E: 13%, C: 21%, G: 66%

48 Years

E: 26%, C: 20%, G: 54%

E: 24%, C: 17%, G: 59%

E: 44%, C: 24%, G: 32%

E: 12%, C: 19%, G: 69%

49 Years

E: 23%, C: 20%, G: 57%

E: 22%, C: 16%, G: 62%

E: 42%, C: 22%, G: 36%

E: 11%, C: 17%, G: 72%

50 Years

E: 20%, C: 20%, G: 60%

E: 20%, C: 15%, G: 65%

E: 40%, C: 20%, G: 40%

E: 10%, C: 15%, G: 75%

51 Years

E: 19%, C: 18%, G: 63%

E: 18%, C: 14%, G: 68%

E: 39%, C: 18%, G: 43%

E: 9%, C: 13%, G: 78%

52 Years

E: 18%, C: 16%, G: 66%

E: 16%, C: 13%, G: 71%

E: 38%, C: 16%, G: 46%

E: 8%, C: 11%, G: 81%

53 Years

E: 17%, C: 14%, G: 69%

E: 14%, C: 12%, G: 74%

E: 37%, C: 14%, G: 49%

E: 7%, C: 9%, G: 84%

54 Years

E: 16%, C: 12%, G: 72%

E: 12%, C: 11%, G: 77%

E: 36%, C: 12%, G: 52%

E: 6%, C: 7%, G: 87%

55 Years

E: 15%, C: 10%, G: 75%

E: 10%, C: 10%, G: 80%

E: 35%, C: 10%, G: 55%

E: 5%, C: 5%, G: 90%

***

सुषमा काणे / राजश्री आगाशे / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2182325) Visitor Counter : 34