पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लोह मंत्रालयाच्या वतीने विशेष मोहीम 5.0 अंतर्गत आयजीओटी पोर्टलवर अभिलेख व्यवस्थापन विषयक ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.

Posted On: 24 OCT 2025 11:52AM by PIB Mumbai

 

लोह मंत्रालयाने विभाग अधिकारी आणि मंत्रालयातील नोंदी व्यवस्थापित करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांसाठी आयजीओटी पोर्टलद्वारे ‘अभिलेख व्यवस्थापन’ विषयक ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम घेतला. हा उपक्रम प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम ड्राईव्ह 5.0 अंतर्गत राबविण्यात आला.

केंद्रीय सचिवालय कार्यालयीन प्रक्रिया मार्गदर्शक, विशेषतः प्रकरण 10 – अभिलेख व्यवस्थापन’ यातील तरतुदी समजून घेणे आणि कार्यान्वित करणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, ज्यामुळे कार्यालयीन प्रक्रियेत कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढेल. आयजीओटी पोर्टलवर मंत्रालयाच्या एकूण 38 अधिकाऱ्यांनी हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. या उपक्रमाद्वारे, लोह मंत्रालयाने प्रभावी अभिलेख व्यवस्थापन’ आणि विशेष मोहिम ड्राईव्ह 5.0 यशस्वी राबविण्याच्या प्रति आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

***

नेहा कुलकर्णी / राज दळेकर / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2182148) Visitor Counter : 11