विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
डॉ. जितेंद्र सिंह यांनी जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रकल्पांचा घेतला आढावा, राज्यांच्या सक्रिय सहभागातून मजबूत जैव-नवोन्मेषाधारित परिसंस्था निर्माण करण्यासाठी प्रादेशिक क्षमतांचा उपयोग करून घेण्याचे केले आवाहन
भारताचे जैवतंत्रज्ञान क्षेत्र हे राष्ट्रीय विकासाचा एक प्रमुख आधारस्तंभ बनले असून, देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देत आहे - डॉ. जितेंद्र सिंह
देशातील जैव - नवोन्मेष क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीने राज्यांच्या मानचित्रणाचे आणि बायो ई3 सेल्स प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू
भारोत्तोलन स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल जैवतंत्रज्ञान विभागाच्या सहसचिव एकता विष्णोई यांचा केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते सत्कार
Posted On:
23 OCT 2025 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2025
राज्यांनी सक्रीय सहभाग देत एक मजबूत जैव नवोन्मेष परिसंस्था निर्माण करण्यासाठी आपापल्या प्रादेशिक सामर्थ्याचा उपयोग करावा असे आवाहन विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले आहे.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी यांच्या अध्यक्षतेखाली आज जैवतंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत भारताच्या जैव-नवोन्मेषक्षेत्राचा विस्तार करण्याच्या उद्देशाने सुरु असलेले विद्यमान प्रकल्प आणि नवीन उपक्रमांचा आढावा घेतला गेला. यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवोन्मेष, परस्पर सहकार्य आणि स्थानिक सहभागाच्या माध्यमातून देशाच्या जैविक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने बायोफाउंड्रीज आणि प्रादेशिक स्तरावरील नवोन्मेष केंद्रांपासून ते राज्या-राज्यांच्या जैवतंत्रज्ञान विषयक क्षमतेवर आधारित विद्यमान मानचित्रणाच्या बाबतीत सुरु असलेल्या अनेक नवीन प्रकल्पांचा आढावा घेतला. राज्यांनी आपल्या स्थानिक सामर्थ्याचा उपयोग करून घेत, तसेच राज्य सरकारांसोबत आणि स्थानिक भागधारकांसोबत अधिकच्या सहकार्याला प्रोत्साहन देत, स्थानिक पातळ्यांवरील जैवतंत्रज्ञान परिसंस्थांना बळकटी देण्याची गरजही त्यांनी या बैठकीत अधोरेखित केली.
भारताचे जैवतंत्रज्ञान क्षेत्र, हे देशाच्या विकासाचा एक प्रमुख आधारस्तंभ बनले आहे. हे क्षेत्र आरोग्यसेवा, कृषी, पर्यावरण आणि औद्योगिक नवोन्मेषाच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देत आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. संशोधन संस्था, स्टार्टअप्स आणि राज्य सरकारे या सगळ्यांना नवोन्मेषविषयक एका सामायिक परिसंस्थेशी जोडले पाहिजे, आणि या माध्यमातून जैवतंत्रज्ञानाला आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाचे सक्षम माध्यम बनवले पाहिजे, हाच केंद्र सरकारचा दृष्टिकोन आहे, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीदरम्यान, डॉ. जितेंद्र सिंह यांनी जागतिक भारोत्तोलन स्पर्धेत देशासाठी रौप्य पदक जिंकलेल्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या सहसचिव एकता विष्णोई यांचा सत्कारही केला. त्यांचे यश केवळ वैयक्तिक यश नाही, तर जागतिक क्रीडा क्षेत्रातील भारताचे वाढते सामर्थ्य आणि अस्तित्वाचे प्रतिबिंब आहे अशा शब्दांत त्यांनी विष्णोई यांच्या कामगिरीचा गौरव केला. क्रीडा क्षेत्राच्या यशातून, भारतातील शिस्तबद्धता, लवचिकता आणि सांघिक कार्याचे दर्शन घडते, हीच गुणात्मकता भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीलाही चालना देत आहे ही बाबही त्यांनी नमूद केली. विष्णोई यांच्या यशदायी वाटचालीतून, संशोधन आणि नवोन्मेष ते क्रीडा आणि जागतिक पातळीवरील नेतृत्वासारख्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या नव्या भारताच्या चिकाटी आणि ध्येयाप्रति समर्पणाच्या भावनेचे दर्शन घडते असे ते म्हणाले.
जैवतंत्रज्ञान विभागाने मानवी शरीरविज्ञान, चयापचय विषयक संशोधन आणि आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रात केलेले कार्य भारतातील कार्य परिणामकारता विज्ञान क्षेत्राच्या भविष्यातील वाटचालीत महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे एका मजबूत, आरोग्यसंपन्न राष्ट्राच्या निर्मितीसाठी जैवतंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्राचे कशा रितीने एकात्मिकीकरण घडवून आणले जाऊ शकते ही बाबही दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या आढाव्यादरम्यान, जैवतंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी बायो फाउंड्रीजचा विस्तार करण्याशी संबंधित, तसेच संशोधन संस्था आणि उद्योगक्षेत्रामधील नव्या भागीदारीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मंत्रालयाच्या वतीने राबवल्या जात असलेल्या अलीकडील उपक्रमांविषयी सादरीकरण केले. या उपक्रमांच्या माध्यमातून बायो फाउंड्रीज क्षेत्राशी संबंधित वैज्ञानिक शोध आणि उपयोजनेतील दरी कमी करून, जैवतंत्रज्ञानविषयक उपाययोजना जलद गतीने आखण्यासाठी, त्यासंबंधीच्या चाचण्यांसाठी आणि मोठ्या प्रमाणातील अंमलबजावणीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीतील आपल्या मार्गदर्शनातून डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताच्या जैवतंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित नवोन्मेष विषयक चळवळीच्या पुढील टप्प्याला चालना देण्यातकचा प्रादेशिक स्तरावरचा सहभाग महत्वाचा असल्याची बाब अधोरेखित केली. जैवतंत्रज्ञान विभागाने राज्यांना आपापल्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रविषयक क्षमतांनुसार मानचित्रण करण्याचे आणि त्यासोबत त्याचे बायो ई3 सेल्स स्थापित करण्याच्या प्रक्रियेशी जोडून घेण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती त्यांनी दिली. हे प्रयत्न जैवतंत्रज्ञ क्षेत्रातील उद्योजकता, शिक्षण आणि सक्षमीकरणावर भर असलेल्या व्यापक बायो ई3 धोरण आराखड्याचा एक भाग असल्याचे ते म्हणाले. या क्षेत्रातील राष्ट्रीय प्राधान्यक्रमांना प्रादेशिक स्तरावरील क्षमतांशी जोडणे हाच या प्रयत्नांमागचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे राज्यांना जैवतंत्रज्ञान मूल्य साखळीशी संबंधित, त्यांच्याकरता असलेल्या संधींचा शोध घेता येईल, आणि केंद्र सरकारच्या मदतीने या संधींचा विकास करता येईल, असे त्यांनी सांगितले.
जैवतंत्रज्ञानविषयक तळागाळातल्या आर्थिक क्षमतेचा पूरेपूर उगयोग करून घेण्यासाठी राज्य सरकारे, विद्यापीठे आणि स्थानिक उद्योगांसोबतचा सहभाग वाढवावा असे आवाहन डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. नवोन्मेषाधारित स्टार्टअप्सना पाठबळ देत तसेच युवा उद्योजक आणि संशोधकांना त्यांच्या संकल्पनांना व्यवहार्य उपाययोजनांमध्ये परावर्तित करण्याकरता प्रोत्साहन देणाऱ्या परिसंस्थांना चालना देण्यासाठी विभाग बजावत असलेल्या भूमिकेचीही त्यांनी प्रशंसा केली.
जैवतंत्रज्ञानाच्या उपयोगाने शाश्वत शेतीपासून ते परवडणाऱ्या आरोग्यसेवा आणि पर्यावरणीय लवचिकतेशी संबंधित भारतातल्या गंभीर समस्यांवर उपाययोजना करता येऊ शकतात असेही डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. परस्पर समन्वित धोरण, गुंतवणूक आणि क्षमता विकासाच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक प्रदेशाला या वैज्ञानिक प्रगतीचा लाभ मिळेल, याची सुनिश्चिती करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताला जैवतंत्रज्ञाधारित नवोन्मेष आणि शाश्वत प्रगतीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने, प्रकल्पांची अंमलबजावणी जलदगतीने करावी, तसेच आंतर सरकारी सहकार्य अधिक बळकट करावे असे आवाहनही त्यांनी केले.



शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2181970)
Visitor Counter : 5