संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोची येथील कोचिन शिपयार्ड लिमिटेड येथे सहाव्या एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी बीवाय 528 (मॅगडाला) चे जलावतरण

प्रविष्टि तिथि: 18 OCT 2025 7:00PM by PIB Mumbai

 

8 अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट्स (एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी) च्या मालिकेतील सहावे जहाज, बीवाय 528 (मॅगडाला) याचे जलावतरण 18 ऑक्टोबर 2025 रोजी कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल) येथे करण्यात आले.

नौदलाच्या सागरी परंपरेनुसार, या जहाजाचे जलावरण श्रीमती रेणू राजाराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युद्धनौका उत्पादन नियंत्रक (सीडब्ल्यूपी अँड ए) व्हाइस ॲडमिरल राजाराम स्वामीनाथन यांच्यासह भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोचीन शिपयार्ड लिमिटेडने स्वदेशात या जहाजाची रचना आणि बांधणी केली आहे. या मालिकेतील पहिले जहाज ऑक्टोबर 2025 च्या अखेरीस नौदलाला सुपूर्द करण्याचे नियोजित आहे. एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी जहाजांमुळे पाण्याखालील क्षेत्रात जागरूकता, पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता आणि खाणकाम क्षमता मोठ्या प्रमाणात वाढतील. या जहाजाला डिझेल इंजिनवर चालणाऱ्या 3 वॉटरजेट्सद्वारे गती दिली जाते, आणि यात हल माउंटेड सोनार आणि लो फ्रिक्वेन्सी व्हेरिअबल डेप्थ सोनार (LFVDS) सारखे अत्याधुनिक रोल डिफाइनिंग सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. तसेच अत्याधुनिक टॉर्पेडो, अँटी-सबमरीन रॉकेट्स, एनएसजी-30 तोफा आणि 12.7 मिमी एसआरसीजी यांच्या माध्यमातून या जहाजाची युद्ध क्षमता वाढवण्यात आली आहे.

मॅगडाला जहाजाचे जलावतरण हे जहाजबांधणी, शस्त्रास्त्रे, सेन्सर्स आणि प्रगत दळणवळण तसेच इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालींमध्ये स्वावलंबनाच्या भारतीय नौदलाच्या सततच्या प्रयत्नात एक महत्त्वाचा टप्पा आहे. 80% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर करून तयार केलेले, हे जहाज भारतीय नौदलाला हिंद महासागर क्षेत्रातील आपल्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी मोठी क्षमता प्रदान करेल.

***

माधुरी पांगे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2180810) आगंतुक पटल : 34
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी