अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दावा न केलेल्या आर्थिक मालमत्तेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी, देशातील 13 राज्यांचे 25 जिल्हे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 15 ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान राबवण्यात आला "आपकी पूँजी, आपका अधिकार" ("तुमचे पैसे, तुमचा हक्क") या देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा

Posted On: 17 OCT 2025 8:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर  2025

दावा न केलेल्या आर्थिक मालमत्तेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी 15 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत देशातील 13 राज्यांमधील 25 जिल्हे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या “आपकी पूँजी, आपका अधिकार”, अर्थात "तुमचे पैसे, तुमचा हक्क", या तीन महिन्यांच्या देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा राबवण्यामध्ये वित्तीय सेवा विभागाने समन्वय साधला. व्याप्ती वाढवण्यासाठी आणि प्रभावी लोकसहभाग सुनिश्चित करण्यासाठी या मोहिमेअंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय जनसंपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

राज्यस्तरीय बँकर्स समित्या (एसएलबीसी) आणि राज्यस्तरीय विमा समित्या (एसएलआयसी) यांनी संबंधित आघाडीच्या जिल्हा बँकांच्या समन्वयाने वित्तीय सेवा विभागाचे (डीएफएस) संपूर्ण  मार्गदर्शन आणि देखरेखीखाली या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमांमध्ये स्थानिक मान्यवर, संसद सदस्य, आमदार आणि जिल्हा अधिकारी यांच्यासह वित्तीय संस्था, नियामक आणि स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. नागरिकांना  दावा न केलेल्या आर्थिक मालमत्तेची तपासणी करण्यासाठी आणि सुलभतेने दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी हेल्पडेस्क आणि डिजिटल किओस्कच्या माध्यमातून सहाय्य करण्यात आले.

वित्त मंत्रालयाचा वित्तीय सेवा विभाग (डीएफएस) ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत "आपकी पूँजी, आपका अधिकार" ही तीन महिन्यांची देशव्यापी जागरूकता मोहीम राबवत आहे. 4 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गुजरातमधील गांधीनगर येथे या योजनेचा प्रारंभ केला होता. या मोहिमेद्वारे नागरिकांना त्यांच्या दावा न केलेल्या ठेवी, विमा रक्कम, लाभांश, शेअर्स, म्युच्युअल फंडातील शिल्लक आणि निवृत्तीवेतनाची थकीत रक्कम याचा शोध घेऊन त्यावर दावा करणे शक्य होईल.

या उपक्रमांमध्ये मोहिमेच्या तीन मार्गदर्शक तत्त्वांवर भर देण्यात आला: जागरूकता, सुलभता आणि कृती. डिजिटल प्रात्यक्षिके आणि माहिती देणाऱ्या काउंटरने समुदाय जागरूकता वाढविली, तर नागरिकांना आर्थिक समावेशन योजनांतर्गत नावनोंदणी करण्यासाठी आणि केवायसी आणि री-केवायसीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे औपचारिक आर्थिक प्रणालीशी त्यांचा संबंध मजबूत झाला.

आपल्या दावा न केलेल्या आर्थिक मालमत्तेवर दावा कसा करावा याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आणि व्हिडिओ आणि मानक कार्य प्रक्रिया (एसओपी) समजून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा:

https://financialservices.gov.in/beta/en/page/apki-poonji-apka-adhikar/

सोनाली काकडे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2180572) Visitor Counter : 5