जलशक्ती मंत्रालय
जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने जनसंपर्क अभ्यासक्रमासाठी इंटर्नशिप उपक्रमाची घोषणा केली
Posted On:
14 OCT 2025 10:49AM by PIB Mumbai
जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने देशात जनसंपर्क क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठे किंवा संस्थांमधील नोंदणीकृत संशोधन प्रतिभावंतांना इंटर्न्स म्हणून सामावून घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या इंटर्नशिप अभ्यासक्रमाअंतर्गत निवडक उमेदवारांना विभागाच्या प्रसार माध्यमे किंवा समाज माध्यमांशी संबंधित उपक्रमांमध्ये अल्प कालावधीसाठी सहभागी करुन घेतले जाईल.
ज्या विद्यार्थ्यांनी जनसंपर्क किंवा पत्रकारिता किंवा संबंधित क्षेत्रामध्ये त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे किंवा जे विद्यार्थी त्यांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा पदविका अभ्यासक्रम वर उल्लेख केलेल्या क्षेत्रात सध्या पूर्ण करत आहेत ( जनसंवाद किंवा संबंधित क्षेत्रात पदवी पूर्ण करण्याच्या अधीन) किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून एम बी ए (मार्केटिंग) अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत ते मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेल्या अटींनुसार यासाठी पात्र असतील. इंटर्नशिपचा कालावधी सहा ते नऊ महिन्यांचा असेल. इंटर्नशिप कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 15,000 रुपये मानधन आणि इंटर्नशिपचे प्रमाणपत्र दिले जाईल. अर्ज करण्याची अंतिम मुदत 24 नोव्हेंबर 2025 आहे. इंटर्नशिपसाठी इच्छुक उमेदवारांनी केवळ ऑनलाइन माध्यमातून https://mowr.nic.in/internship वरअर्ज करावा.
***
AshishSangle/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178814)
Visitor Counter : 16