सांस्कृतिक मंत्रालय
भारताच्या वतीने रशियाच्या काल्मीकिया प्रजासत्ताक इथे भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे प्रदर्शन
प्रविष्टि तिथि:
10 OCT 2025 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात सुरक्षितपणे जतन केलेले भगवान बुद्ध यांचे पवित्र अवशेष, रशियातील काल्मीकिया प्रजासत्ताकमध्ये एका प्रदर्शनासाठी पाठवले जाणार आहेत. या अवशेषांसोबत 11 वरिष्ठ भारतीय भिक्खूंचे उच्च-स्तरीय शिष्टमंडळ जाणार आहे. हे शिष्टमंडळ तिथल्या स्थानिक अनुयायांना आशीर्वाद देतील तसेच ते प्रामुख्याने बौद्ध लोकसंख्या असलेल्या या प्रदेशात धार्मिक विधीही पार पाडतील.

काल्मीकिया इथे पोहोचल्यावर, काल्मीकियातील बौद्ध समुदायाचे प्रमुख, शाजिन लामा गे शे तेंझिन चोइडक, काल्मीकियाचे प्रमुख बातू सर्गेयेविच खासिकोव्ह आणि प्रतिष्ठित बौद्ध संघाचे इतर सदस्य या पवित्र अवशेषांचा श्रद्धापूर्वक स्विकार करतील.

लडाखचे पूज्य बौद्ध भिक्खू आणि राजदूत 19 वे कुशोका बाकुला रिंपोचे यांनी मंगोलियात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्यानंतर रशियाच्या बुर्यातिया, काल्मीकिया आणि तुवा या तीन प्रदेशांमध्येही बौद्ध धर्माबद्दलची ओढ पुन्हा निर्माण करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती याचे या निमित्ताने स्मरण करणेही तितकेच महत्वाचे आहे.

रशियामध्ये पहिल्यांदाच हे पवित्र अवशेष प्रदर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ, राष्ट्रीय संग्रहालय आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. एलिटा या राजधानीच्या शहरात, 11 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन केले जाईल.
हे पवित्र अवशेष एलिटा येथील मुख्य बौद्ध विहारात सुरक्षितपणे ठेवले जातील. हे बौद्ध विहार गेडेन शेडअप चोईकोरलिंग विहार तसेच शाक्यमुनी बुद्धांचे सुवर्ण निवासस्थान म्हणूनही ओळखले जाते. हे एक महत्त्वाचे तिबेटी बौद्ध केंद्र असून, ते 1996 मध्ये लोकांसाठी खुले करण्यात आले होते, आणि ते काल्मीकीच्या विस्तीर्ण गवताळ प्रदेशाने वेढलेले आहे.
या निमित्ताने बौद्धांचे केंद्रीय आध्यात्मिक प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ यांच्यात एक सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे.
यावेळी कर्नाटकातील धारवाड मधील विनोद कुमार यांच्या संकल्पनेतून साकारलेले, सुमारे 90 देशांमधील बौद्ध टपाल तिकीटाचे एक अभिनव प्रदर्शन देखील आयोजित केले जाणार आहे.
***
सुषमा काणे / तुषार पवार / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2177433)
आगंतुक पटल : 46