केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2025 लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

Posted On: 10 OCT 2025 11:24AM by PIB Mumbai

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 14 सप्टेंबर 2025 रोजी पार पडलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2025 च्या निकालाच्या आधारेयादीमध्‍ये  नमूद हजेरी क्रमांक असलेले 9085 उमेदवार संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.

ज्या उमेदवारांचे हजेरी क्रमांक  याद्यांमध्ये दर्शवले आहेत, त्यांची उमेदवारी तात्पुरती असेल. परीक्षेतील प्रवेशाच्या अटींनुसार, त्यांना वय (जन्मदिनांक) आणि शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणून मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहे.

भारतीय लष्करी अकादमी आणि भारतीय नौदल अकादमी साठी 1 जुलै 2026 पूर्वी, हवाई दल अकादमी साठी 13 मे 2026 पूर्वी आणि केवळ अल्पकालावधी सेवा आयोग (SSC) अभ्यासक्रमासाठी 1 ऑक्टोबर 2026 पूर्वी मूळ प्रमाणपत्रे सादर करायची आहेत. उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे कोणतीही मूळ प्रमाणपत्रे पाठवू नयेत.

उमेदवार आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊनही आपल्या निकालासंबंधीची माहिती मिळवू शकतात.

उमेदवारांचे गुणपत्रक अधिकारी प्रशिक्षण अकादमीअभ्यासक्रमाचा अंतिम निकाल (एसएसबी मुलाखत घेतल्यानंतर) प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल आणि ते संकेतस्थळावर 30 दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध राहील.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.

***

सुवर्णा बेडेकर / तुषार पवार / परशुराम कोर


(Release ID: 2177246) Visitor Counter : 22