कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'विव्हिंग इंडिया टुगेदर' या नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विणकर आणि कारागिरांशी साधला संवाद

Posted On: 08 OCT 2025 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2025

नवी दिल्लीतील एनएएससी कॉम्प्लेक्समधील सी. सुब्रमण्यम सभागृहात आयोजित 'विव्हिंग इंडिया टुगेदर' या राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ईशान्येकडील कारागीर आणि विणकरांशी संवाद साधला. त्यांच्या समृद्ध कारागिरी आणि सांस्कृतिक वारशाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांमध्ये आयसीएआरचे महासंचालक आणि डीएआरई सचिव डॉ. मांगी लाल जाट आणि आयसीएआरचे उपमहासंचालक, कृषी विस्तार डॉ. राजबीर सिंह यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाने कारागिरांना त्यांचे अनुभव, आव्हाने आणि आकांक्षा मांडण्यासाठी मंच प्राप्त करून दिला आणि धोरणकर्ते आणि अधिकाऱ्यांना पारंपरिक कारागिरी आणि आधुनिक बाजारपेठांमधील समन्वय मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. ग्रामीण कारागिरांच्या समावेशक विकासाद्वारे 'व्होकल फॉर लोकल' आणि आत्मनिर्भर भारताचे दृष्टिकोन या कार्यक्रमाने अधोरेखित केले.

या कार्यक्रमात इंफाळच्या केंद्रीय कृषी विद्यापीठाने विणकाम परंपरांना प्रोत्साहन देण्यासाठी, कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि सामुदायिक हस्तकलांसाठी आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली गेली आणि त्यांचे कौतुक करण्यात आले.

निलीमा चितळे/वासंती जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2176581) Visitor Counter : 18