संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लष्करी संप्रेषणात आंतरपरिचालन सक्षम करण्यासाठी डीआरडीओद्वारे इंडियन रेडिओ सॉफ्टवेअर आर्किटेक्चर मानक 1.0 जारी

Posted On: 07 OCT 2025 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2025

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) एकात्मिक संरक्षण कर्मचारी (आयडीएस) आणि तिन्ही सैन्यदलांच्या सहकार्याने, 7 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्लीतील डीआरडीओ भवन येथे आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत, लष्करी संप्रेषणात इंटरऑपरेबिलिटी म्हणजेच आंतरपरिचालन सक्षम करण्यासाठी इंडियन रेडिओ सॉफ्टवेअर आर्किटेक्चर (आयआरएसए) मानक 1.0 औपचारिकपणे जारी केले. आयआरएसए हे सॉफ्टवेअर डिफाइन्ड रेडिओसाठी एक व्यापक सॉफ्टवेअर विनिर्देश आहे, जे प्रमाणित इंटरफेस, एपीआय, एक्झिक्युशन एन्व्हायर्नमेंट आणि वेव्हफॉर्म पोर्टेबिलिटी मेकॅनिझम परिभाषित करते. आयआरएसए ची रचना वेव्हफॉर्म पोर्टेबिलिटी, एसडीआर इंटरऑपरेबिलिटी, प्रमाणन आणि अनुरूपण सुनिश्चित करण्यासाठी केली आहे.

आयआरएसएचा समावेश संरक्षण संप्रेषण तंत्रज्ञानात आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताच्या प्रवासातील एक निर्णायक पाऊल आहे , जे स्वदेशी, आंतर-कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज एसडीआर उपाययोजनेच्या दृष्टिकोनाला मूर्त रूप देते . स्वदेशी बनावटीचे हे तंत्रज्ञान भारतासाठी आणि जगासाठी उपलब्ध आहे. याची संरचना परिचालन आवश्यकतांनुरुप केली आहे, जे भविष्यातील तंत्रज्ञान एकत्रित करेल.

कार्यशाळेत आयआरएसएचा प्रवास, त्याचा तांत्रिक आढावा, परिसंस्थेच्या भूमिका आणि भविष्यातील दिशानिर्देशांचा समावेश होता. यामुळे उद्योग, शैक्षणिक संस्था आणि तिन्ही सेवादलांना सहकार्याच्या संधी, पथदर्शी प्रकल्प आणि स्वीकृत मार्गांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले.

या कार्यक्रमात भारतीय सशस्त्र दल, संरक्षण उत्पादन विभाग , संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम , उद्योग, शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी स्वदेशी संप्रेषण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व्यापक आणि सहयोगी दृष्टिकोन अधोरेखित केला. डीडी संशोधन आणि विकास सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

सुषमा काणे/वासंती जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2175969) Visitor Counter : 9
Read this release in: English , Urdu , Hindi