निती आयोग
भारतात अटल टिंकरिंग प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यासाठी अटल नवोन्मेष अभियान आणि भारत-फ्रान्स वाणिज्य आणि उद्योग मंडळ (आयएफसीसीआय) एकत्र येणार
Posted On:
06 OCT 2025 6:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2025
भारत-फ्रान्स वाणिज्य आणि उद्योग मंडळ (आयएफसीसीआय) आणि भारत सरकारच्या नीती आयोगाच्या अधिपत्याखालील अटल नवोन्मेष अभियान (एआयएम) यांनी 19 सप्टेंबर 2025 रोजी फ्रान्सचे भारतातील राजदूत थिर्री मथाऊ यांच्या उपस्थितीत हेतू निवेदनावर (स्टेटमेंट ऑफ इंटेंट) अधिकृतरित्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सामाजिक विकासासाठी प्रभावी भारत-फ्रान्स भागीदारीची जोपासना करण्यात आयएफसीसीआय करत असलेल्या प्रयत्नांचे थिर्री मथाऊ यांनी कौतुक केले.
नवी दिल्ली येथील फ्रेंच दूतावासात आयोजित “शाश्वत विकासासाठी स्केल-क्रॉस-सेक्टोरल भागीदारीसाठी सहयोग” या संकल्पनेवर आधारित तिसऱ्या वर्षीच्या आयएफसीसीआय ईएसआर कनेक्ट डे 2025 या कार्यक्रमात सदर स्वाक्षऱ्या झाल्या. भारतीय तसेच फ्रेंच कॉर्पोरेट नेते, राजनैतिक मुत्सद्दी व्यक्ती, सरकारचे प्रतिनिधी, बिगर सरकारी संघटना आणि इतर सीएसआर भागधारकांसह 100 हून अधिक सहभागी यावेळी उपस्थित होते.
एसओएल वर झालेल्या स्वाक्षऱ्या म्हणजे आयएफसीसीआयच्या विस्तृत भारत-फ्रेंच कॉर्पोरेट जाळ्याशी धोरणात्मक सहयोगाच्या माध्यमातून एसटीईएम शिक्षण, डिजिटल साक्षरता आणि नवोन्मेष-प्रेरित अध्ययनाला चालना देण्यात गाठलेला महत्त्वाचा टप्पा आहे. पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी, पाठ्यक्रम वितरण सुधारण्यासाठी आणि एटीएल कार्यक्रमांच्या माध्यामातून अधिक दृढ उद्योग-विद्यालय सहभाग शक्य करण्यासाठी सीएसआर आणि कॉर्पोरेट पाठबळाला गतिशील करणे हे सदर भागीदारीचे उद्दिष्ट आहे. एकूणात, आयएफसीसीआय तिच्या सदस्य कंपन्या आणि अंमलबजावणी भागीदारांसह देशभरात त्यांच्या सीएसआर हस्तक्षेपांच्या माध्यमातून या उपक्रमाचा परीघ वाढवेल आणि शाळा तसेच वंचित समुदायांमध्ये दीर्घकालीन, शाश्वत परिणाम शक्य करेल.
फ्रान्सचे भारतातील राजदूत राजदूत थिर्री मथाऊ यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या समारंभ पार पडला असून त्यांनी याप्रसंगी सामाजिक विकासासाठी प्रभावी भारत-फ्रान्स भागीदारीची जोपासना करण्यात आयएफसीसीआय करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. “फ्रेंच दूतावासात आयोजित आयएफसीसीआय सीएसआर कनेक्ट चर्चासत्र सामाजिक प्रभावात भारत-फ्रान्स सहकार्य बळकट करण्यासाठीचा महत्त्वाचा मंच ठरले आहे. भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी 2026 हे वर्ष भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष म्हणून जाहीर केल्यामुळे हे वर्ष म्हणजे महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे असे दिसते. ही दूरदृष्टी तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन आपल्या द्विपक्षीय नातेसंबंधांचा महत्त्वाचा पैलू म्हणून सामाजिक प्रगतीला महत्त्व देते. या संदर्भात, मी फ्रेंच आणि भारतीय व्यवसायांना शाश्वतता आणि सामाजिक प्रभाव यामधील नेतृत्वाचे दर्शन घडवण्याची संधी म्हणून सीएसआरकडे बघण्यासाठी जोरदार प्रोत्साहन देतो,” ते म्हणाले.
हा संयुक्त उपक्रम, एटीएल अंमलबजावणी तसेच सुधारणा करणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे, नवोन्मेष स्पर्धा आयोजित करणे तसेच अध्ययन आणि विकासाची शाश्वत परिसंस्था जोपासणे यासाठी निवडक सरकारी शाळा निश्चित करून त्यांना पाठबळ पुरवेल.
* * *
शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175499)
Visitor Counter : 3