पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने आय एन एस अँड्रोथ या युद्धनौकेला भारतात तयार झालेल्या स्वदेशी स्टीलने सज्ज करुन भारताच्या नौवहन क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला दिली बळकटी

Posted On: 06 OCT 2025 5:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑक्‍टोबर 2025

 

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक आणि महारत्न कंपनी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने 06.10.2025 रोजी भारतीय नौदलात समाविष्ट झालेल्या आय एन एस अँड्रोथ या युद्धनौकेला आवश्यक असलेल्या विशेष दर्जाच्या पोलादाचा पुरवठा केला. भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासातील हा एक अभिमानास्पद टप्पा आहे.

आयएनएस अँड्रोथ ही  पाणबुडी विरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका असून (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) कॉर्वेट्सच्या मालिकेतील हे  दुसरे जहाज आहे, आयएनएस अर्नाळा  हे पहिले जहाज 18 जून 2025 रोजी ताफ्यात दाखल झाले.

83571.jpg

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (GRSE) यांनी बांधलेल्या आयएनएस  अर्नाळा  आणि अँड्रोथसह पाणबुडी विरोधी उथळ पाण्यातील आठ युद्धनौकांसाठी  स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने विशेष दर्जाच्या पोलादाचा संपूर्ण पुरवठा केला असून त्यात  एच आर शीट्स आणि प्लेट्सचा समावेश आहे. या जहाजाच्या निर्मितीसाठी लागलेले पोलाद, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या बोकारो, भिलाई आणि राउरकेला येथील प्लांटमधून आणण्यात आले. आयएनएस अँड्रोथ नौदलाच्या ताफ्यात दाखल होणे ही बाब  भारताच्या वाढत्या सागरी क्षमता आणि "आत्मनिर्भर भारत" या देशाच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे.

स्वदेशी पोलाद  उत्पादनातून स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचा धोरणात्मक संरक्षण पायाभूत सुविधा सक्षम करण्याचा दृढनिश्चय आणि आत्मनिर्भर भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा दिसून येतो.

 

* * *

शैलेश पाटील/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2175488) Visitor Counter : 6
Read this release in: English , Urdu , Hindi