भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

निवडणूक निरीक्षक हे लोकशाहीचे दीपस्तंभ आहेत : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार

Posted On: 03 OCT 2025 4:48PM by PIB Mumbai

 

  1. आगामी बिहार विधानसभा निवडणूक तसेच काही राज्यांतील पोटनिवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नेमण्यात येणाऱ्या सामान्य, पोलीस दलातील तसेच व्यय निरीक्षकांना माहिती देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने आज बैठकीचे आयोजन केले.
  2. भारतीय प्रशासकीय सेवेतील 287 अधिकारी, पोलीस दलातील 58 अधिकारी आणि आयआरएस/आयआरएएस/आयसीएएस तसेच इतर सेवांतील 80 अधिकारी यांच्यासह एकूण 425 अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. नवी दिल्ली येथील आयआयआयडीईएम येथे ही  बैठक आयोजित करण्यात आली होती.
  3. मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू आणि डॉ.विवेक जोशी यांनी केंद्रीय निरीक्षकांना माहिती दिली. निरीक्षकांना संबोधित करताना सीईसी ज्ञानेश कुमार यांनी त्यांना लोकशाहीचे दीपस्तंभ असे संबोधले.
  4. निवडणूक आयोगाचे डोळे आणि कान समजले जाणाऱ्या केंद्रीय निरीक्षकांना निवडणुकीचे कायदे, नियम आणि मार्गदर्शक तत्वे समजून घेऊन, प्रत्यक्ष कार्यस्थळावरील माहिती देणे आणि कठोर तसेच निष्पक्षपाती नियमपालनाची सुनिश्चिती करून घेण्यास सांगितले.
  5. सर्व राजकीय पक्ष, उमेदवार तसेच मतदार यांच्या तक्रार निवारणासाठी निरीक्षकांनी पूर्णपणे उपलब्ध राहण्याच्या सूचना या निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.
  6. या निरीक्षकांनी मतदान केंद्रांना भेट द्यावी आणि मतदारांच्या सोयीसाठी आयोगाने अलीकडच्या काळात हाती घेतलेल्या उपक्रमांची योग्य अंमलबजावणी होत आहे याची खात्री करून घ्यावी अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
  7. खुल्या आणि योग्य वातावरणात निवडणुका घेण्यात आयोगाला मदत करण्याच्या हेतूने संविधानातील कलम 324 तसेच लोक प्रतिनिधित्व कायदा,1951 मधील कलम 20बीअंतर्गत केंद्रीय निवडणूक आयोगाला बहाल करण्यात आलेल्या पूर्ण अधिकारांचा वापर करून आयोग या केंद्रीय निरीक्षकांची नेमणूक करतो.कार्यस्थळावर निवडणूक प्रक्रियेच्या प्रभावी व्यवस्थापना वरही ते देखरेख ठेवतात.

***

निलिमा चितळे / संजना चिटणीस / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2174595) Visitor Counter : 18
Read this release in: English , Urdu , Hindi , Malayalam