संरक्षण मंत्रालय
केनिया नौदलाचे कमांडर मेजर जनरल पॉल ओवूर ओटिएनो यांची दक्षिण नौदल कमांडला भेट
Posted On:
02 OCT 2025 6:11PM by PIB Mumbai
केनिया नौदलाचे कमांडर मेजर जनरल पॉल ओवूर ओटिएनो यांनी चार सदस्यीय शिष्टमंडळासह भारताच्या अधिकृत भेटीचा भाग म्हणून 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत कोची येथील दक्षिण नौदल कमांडला (एसएनसी) भेट दिली.
या भेटीदरम्यान, दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस अॅडमिरल व्ही. श्रीनिवास यांच्याशी केनिया नौदलाच्या कमांडर यांच्याशी संवाद साधला. तसेच दोन्ही नौदलांदरम्यान प्रशिक्षण सहकार्य आणि सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या मार्गांवरही चर्चा केली. यावेळी भारतीय नौदलाच्या व्यावसायिक आणि परिचालन प्रशिक्षण आराखड्याचा संक्षिप्त आढावा भेट देणाऱ्या शिष्टमंडळाला सादर करण्यात आला. या चर्चेत, मेजर जनरल ओटिएनो यांनी केनियासह इतर हिंद महासागर क्षेत्रातील नऊ राष्ट्रांनी भारतीय नौदलाच्या पहिला पुढाकार असलेल्या, प्रादेशिक समन्वयाच्या दिशेने टाकलेल्या विलक्षण उपक्रम असलेल्या हिंद महासागर जहाज- सागरचे (आयओएस सागर) कौतुक केले. प्रशिक्षण देवाणघेवाण आणि सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करीत प्रादेशिक सहकार्य वृद्धिंगत करण्याचे महत्त्व, क्षमता वृद्धी आणि आणि परस्पर कार्यक्षमता सुनिश्चित करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. पहिल्या दीर्घकालीन प्रशिक्षण तैनातीला मोम्बासामध्ये द्विपक्षीय संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा मानला गेला आहे.
केनियाच्या प्रतिनिधीमंडळाने दक्षिण नौदल कमांडमध्ये असलेल्या विविध प्रशिक्षण शाळांना भेट दिली आणि अत्याधुनिक सिम्युलेटर आणि प्रगत प्रशिक्षण सुविधा यांवरील सादरीकरण पाहिले. सागरी प्रशिक्षण मुख्यालयामध्ये, परिचालन समुद्री प्रशिक्षणावर चर्चा झाली आणि प्रशिक्षण सहकार्याची गती अधिक वृद्धिंगत करण्यासाठीच्या मार्गांवर विचारविनिमय करण्यात आला. फास्ट अटॅक क्राफ्ट, आयएनएस काब्रा या जहाजांनाही शिष्टमंडळाने भेट दिली. नौदल रूग्णालय आयएनएचएस संजीवनी येथे उपलब्ध असलेल्या बहुविशेष वैद्यकीय सुविधांबद्दल माहिती देण्यात आली.
भारतीय नौदल 1990 पासून केनिया नौदलासमवेत प्रशिक्षणाच्या माध्यमातून सागरी उत्कृष्टतेला प्रोत्साहन देत आहे. केनियाच्या नौदल कमांडर यांचा सागरी नौका केंद्राचा दौरा याच सागरी भागीदारीचे प्रतीक आहे. दोन्ही नौदलांचा समुद्री सुरक्षा व प्रादेशिक स्थिरतेच्या प्रगतीसाठी असलेली सामायिक वचनबद्धता दृढ करते.
(5)HWXE.jpeg)
(5)CANH.jpeg)
(5)LGIX.jpeg)
***
शैलेश पाटील / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2174317)
Visitor Counter : 3