आयुष मंत्रालय
पत्र सूचना कार्यालयाकडून ‘स्वच्छता मित्र’ व अधिकारी यांच्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी व सल्ला शिबीराचे आयोजन
आयुर्वेद व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (ए.आय.आय.ए.) तसेच डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे सहकार्य
Posted On:
01 OCT 2025 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2025
पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी), आयुष मंत्रालयांतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (ए.आय.आय.ए.), दिल्ली आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालय, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने ‘स्वच्छता मित्र’ व पीआयबी अधिकारी यांच्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी व सल्ला शिबीर आज शास्त्री भवन व नॅशनल मीडिया सेंटर (एन.एम.सी.) येथे आयोजित केले.
हे शिबीर स्वच्छता ही सेवा अभियान 2025 (17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर) च्या अनुषंगाने भरविण्यात आले असून आरोग्य, कल्याण व सेवाभिमुख उपक्रमांना चालना देणे हा उद्देश होता.
या एकात्मिक आरोग्य शिबिरात दोन प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
आयुर्वेद सेवा शास्त्री भवन येथे : डॉ. रमाकांत यादव (अतिरिक्त प्राध्यापक) व डॉ. राजाराम महतो (सह-प्राध्यापक), कायाचिकित्सा विभाग, ए.आय.आय.ए. यांच्या नेतृत्वाखाली अॅलोपॅथी सेवा नॅशनल मीडिया सेंटर येथे : डॉ. शैलेश कुमार (प्राध्यापक – मेडिसिन) व डॉ. रमेशचंद मीणा (सह-प्राध्यापक व नोडल अधिकारी), डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालय यांच्या मार्गदर्शनाखाली,दोन्ही संस्थांच्या वैद्यकीय पथकांनी, सल्लागार व परिचारिका कर्मचाऱ्यांसह, सर्वसमावेशक आरोग्य तपासण्या केल्या व सल्ला दिला.
आयुर्वेद शिबिरात 50 हून अधिक स्वच्छता मित्र व 200 अधिकाऱ्यांनी लाभ घेतला.
अॅलोपॅथी शिबिरात सुमारे 195 अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक तपासणी व सल्ला घेतला.
शिबिरात “स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान” हाही उपक्रम राबविण्यात आला. महिला अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून सरकारचा महिलांच्या आरोग्य व कौटुंबिक कल्याणावर असलेला भर अधोरेखित केला.
पीआयबीच्या महासंचालिका अनुपमा भटनागर यांनी ए.आय.आय.ए. व डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन गौरविले.



* * *
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2173971)
Visitor Counter : 3