संरक्षण मंत्रालय
केनियाच्या नौदलाचे कमांडर मेजर जनरल पॉल ओवूओर ओटिनो भारत दौऱ्यावर
प्रविष्टि तिथि:
29 SEP 2025 7:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2025
केनियाच्या नौदलाचे कमांडर मेजर जनरल पॉल ओवूओर ओटिनो हे 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान भारताच्या सरकारी दौऱ्यावर आहेत, सागरी सहकार्य आणि द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणे हा या भेटीचा उद्देश आहे.
29 सप्टेंबर 2025 रोजी, नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक लॉन्स येथे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी मेजर जनरल ओटिनो यांचे स्वागत केले, यावेळी त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. बैठकीदरम्यान सागरी सहकार्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यामध्ये परिचालन ,प्रशिक्षण आणि हायड्रोग्राफिक सहभाग, बहुपक्षीय सराव AIKEYME चे आयोजन आणि भारत-केनिया 'बहारी' सागरी व्हिजन अंतर्गत भागीदारी दृढ करणे यांचा समावेश होता. मेजर जनरल ओटिनो यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.
VZ14.jpeg)
प्रशिक्षण सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मेजर जनरल ओटिनो गुरुग्राम येथील भारतीय महासागर क्षेत्रासाठी माहिती संलयन केंद्र तसेच कोची येथील भारतीय नौदलाच्या दक्षिण नौदल कमांडच्या प्रशिक्षण आस्थापनांना भेट देणार आहेत.
केनियाचे नौदल हिंद महासागर क्षेत्रातील एक महत्वाचा सागरी भागीदार असून बहुपक्षीय सराव AIKEYME, इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम (IONS), गोवा सागरी परिषद आणि जिबूती आचारसंहिता - जेद्दाह सुधारणा (DCoC-JA) मध्ये त्याचा सक्रिय सहभाग आहे.
मेजर जनरल पॉल ओटिनो यांची भेट भारत-केनिया नौदल संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो सामायिक हितसंबंध आणि हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षेप्रति सामायिक वचनबद्धतेला बळकटी देतो.
2CBX.jpeg)
FBS4.jpeg)
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2172837)
आगंतुक पटल : 78