मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन विभागाने आयोजित केलेल्या ‘वर्ल्ड फूड इंडिया 2025 या उपक्रमाचा यशस्वी समारोप ; भविष्यातील दुग्धोत्पादन आणि पशुधन तंत्रज्ञानाने प्रतिनिधींना मिळाले प्रोत्साहन

Posted On: 29 SEP 2025 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2025

 

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने (DAHD) 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केलेल्या वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवला. दिनांक 25 सप्टेंबर रोजी राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या विभागाच्या मंडपात 15 स्टार्टअप्स एकत्र आले होते, ज्यात पशुधनावर आधारित दुग्धजन्य पदार्थांपासून ते क्षेत्रातील अत्याधुनिक तांत्रिक प्रगतीपर्यंत विविध नाविन्यपूर्ण उत्पादने आणि उपाययोजना प्रदर्शित करण्यात आल्या.प्रमुख आकर्षणांमध्ये स्टार्टअप्सची थेट प्रात्यक्षिके आणि विशेष  डिझाइन केलेले "सेल्फी पॉइंट" यांचा समावेश होता, ज्यामुळे यात नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले.मंडपात सरकारच्या प्रमुख योजना, नवे उपक्रम आणि तांत्रिक प्रगती  यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते, ज्यातून पशुधन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील शाश्वत वाढीसाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाची वचनबद्धता प्रतिबिंबित झाली.

उद्घाटनाच्या दिवशी भारत मंडपम येथे झालेल्या सीईओ गोलमेज परिषदेत हा विभाग सहभागी झाला होता, ज्यामध्ये उद्योगातील नेत्यांशी विविध प्रदेशांतील संधी आणि धोरणात्मक समर्थन यावर चर्चा झाली. विभागाने 25 सप्टेंबर रोजी "शाश्वत पशुधन उत्पादन: गोवंशीय क्षेत्रातील उदयोन्मुख संधी" या विषयावर एक  माहितीसत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये गोवंशीय क्षेत्रातील संधींचा लाभ घेणे आणि कायम स्वरुपी उपाययोजनांना  गती देणे यावर लक्ष केंद्रित केले गेले. मंडपात उद्योजक, नवोन्मेषक, धोरणकर्ते तसेच परदेशी प्रतिनिधींचा उत्साहवर्धक सहभाग दिसून आला. भारताच्या पशुधन आणि दुग्धजन्य परिसंस्थेला अग्रेसर करण्यासाठी सरकारी योजना, गुंतवणूकीच्या शक्यता आणि भविष्यातील सहकार्य यावर संवाद साधण्यासाठी या मंचाने एक गतिमान व्यासपीठ म्हणून काम केले.

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2172662) Visitor Counter : 32