कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांचे प्रसिद्धीपत्रक

Posted On: 26 SEP 2025 3:20PM by PIB Mumbai

 

गेल्या अनेक महिन्यांपासून, कोळसा मंत्रालयाने भारताचे पायाभूत क्षेत्र असलेल्या या क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी आणि कोळसा क्षेत्राशी जोडलेल्या प्रत्येक सदस्याच्या कल्याणाला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील याची सुनिश्चिती करण्यासाठी अथकपणे काम केले आहे. आज, मला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुआयामी  नेतृत्वाखाली आणि द्रष्ट्या मार्गदर्शनाखाली आम्ही गाठलेल्या काही महत्त्वाच्या टप्प्याबद्दलची माहिती सामायिक करताना अभिमान वाटतो आहे.

कोळसा क्षेत्राने उत्पादन आणि कार्यक्षमतेत केवळ नवीन मापदंडच स्थापित केले नाहीत, तर त्या ही पलीकडे, आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठीही महत्वाची पाऊले उचलली आहेत. यातलेच काही महत्वाच्या यशाचे टप्पे खाली नमूद केले आहेत.  :

कोणताही विमा हप्ता न भरता विस्तारित विमा संरक्षण : कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षणाचे कवच 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. यामुळे कुटुंबांकरता मजबूत आर्थिक सुरक्षेची सुनिश्चिती झाली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना विमा हप्त्यापोटी कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही.

कोणताही विमा हप्ता न भरता अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी विस्तारित विमा संरक्षण : पहिल्यांदाच अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी देखील विमा संरक्षणाची सुविधा दिली गेली आहे. यामुळे सर्वंकष कल्याणाच्या दिशेने एक समावेशक पाऊल टाकले गेले आहे. या कर्मचाऱ्यांनाही विमा हप्त्यापोटी कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही.

कोल इंडिया लिमिटेड (CIL) आणि तिच्या उपकंपन्यांमध्ये अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना एकसमान पोशाख संहिता  लागू केली गेली. यातून समानता, एकता आणि या संपूर्ण परिवाराच्या एक सामायिक ओळखीची प्रचिती येते.

सानुग्रह अनुदानात वाढ  : सानुग्रह अनुदानाची रक्कम 15 लाख रुपयांवरून 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, यातून कठीण काळात कुटुंबांना आधार देण्याच्या मंत्रालयाच्या वचनबद्धतेची प्रचिती येते.

प्रत्येक कर्मचाऱ्याच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, त्याला अनुसरूनच कोल इंडिया लिमिटेड, तिच्या उपकंपन्या आणि सिंगरेनी कोलियरीज कंपनी लिमिटेडच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी कामगिरी  - संलग्न बक्षीसाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती सामायिक करतानाही मला आनंद होतो आहे.  याअंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या समर्पण आणि अथक प्रयत्नांसाठी बक्षीस म्हणून 1,03,000 रुपये दिले जाणार आहेत.

सणासुदीचे दिवस अगदी जवळ येऊन ठेपलेले असताना केलेली ही घोषणा म्हणजे, प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी विकास तसेच सन्मान आणि कल्याण एकत्रितपणे वाटचाल करतात अशा केंद्र सरकारच्या प्रशासनिक प्रारुपाचे खरे प्रतिबिंब आहे. हे केवळ एक आर्थिक बक्षीस नसून, राष्ट्राला ऊर्जा देणाऱ्या या संपूर्ण परिवाराची दखल घेणारा, कृतज्ञता व्यक्त करणारा आणि सक्षमीकरणाचा एक संदेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे द्रष्टे  नेतृत्वातून आपल्याला कायमच लोकांना धोरणांच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे मार्गदर्शन मिळत आले आहे. त्यांनी दाखवलेल्या दिशेमुळे कार्यक्षमतेच्या बाबतीत मजबूत असण्यासोबतच भावनिकदृष्ट्या संवेदशील असलेल्या क्षेत्राची जडणघडण करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते..

या संपूर्ण परिवाराने आपल्या एकजुटीतून, भारताची ताकद ही तिच्या कामगारांच्या एकतेमध्ये आणि तिच्या दृष्टिकोनासंबंधीच्या स्पष्टतेमध्ये असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. आम्ही नवे मापदंड स्थापित करण्यासाठी तसेच आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्यासाठी एक मजबूत, अधिक सुरक्षित भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने कायमच प्रयत्नशील राहू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे, भारत Reform, Perform  आणि Transform (सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन) या मंत्राच्या आधारेच वाटचाल करत असून, आता हा भारत जगाला मंदावलेल्या प्रगतीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी  मदत करण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचला आहे. पंतप्रधानांचे हे शब्द आम्हाला नव्या दृढनिश्चयाने पुढे जात राहण्याची प्रेरणा देतात, यातूनच कोळसा क्षेत्र प्रगती आणि कल्याण या दोन्हींचा एक आधारस्तंभ राहील याची सुनिश्चिती होते.

***

शैलेश पाटील / तुषार पवार / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2171980) अभ्यागत कक्ष : 34