आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नवी दिल्लीत निर्माण भवन येथे 'एक दिवस, एक तास, एक साथ' मोहिमेचे केले नेतृत्त्व
Posted On:
25 SEP 2025 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2025
राष्ट्रव्यापी ऐच्छिक स्वच्छता मोहिमेअंतर्गत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज नवी दिल्लीत निर्माण भवन परिसरातील रस्त्यालगत 'एक दिवस, एक तास, एक साथ' ही मोहीम आयोजित केली होती. सकाळी आठ वाजता सुरु झालेल्या या मोहिमेत मंत्रालयाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी उत्साहात सहभाग घेतला.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी श्रमदानात सक्रीय सहभाग घेऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या उपस्थितीमुळे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि साफसफाईप्रती असलेल्या सामूहिक जबाबदारीच्या जाणीवेचा संदेश अधिक बळकट केला.
EYF2.jpeg)
सध्या सुरु असलेल्या स्वच्छता ही सेवा मोहिमेचा एक भाग असलेला हा उपक्रम म्हणजे स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण भारतासाठी समुदायाचा सहभाग आणि नागरिकांच्या कृतीला चालना देण्याचा प्रयत्न आहे. मंत्रालयाचे सर्व विभाग आणि भागांतील कर्मचाऱ्यांनी यात भाग घेतला आणि राष्ट्रव्यापी चळवळीच्या भावनेत आपले योगदान दिले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्वच्छ भारताच्या दृष्टिकोनाप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला असून स्वच्छ, आरोग्यपूर्ण आणि शाश्वत भविष्यासाठी नागरिकांचा सातत्यपूर्ण सहभाग आणि सामूहिक प्रयत्न अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित केले आहे.
24T8.jpeg)
* * *
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2171508)
Visitor Counter : 6