संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्र्यांनी मोरोक्कोमध्ये व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी टीएएसएलच्या संरक्षण उत्पादन सुविधेचे केले उद्घाटन
Posted On:
23 SEP 2025 11:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मोरोक्कोचे संरक्षण मंत्री अब्देलतिफ लौदी यांनी 23,सप्टेंबर 2025 रोजी मोरोक्कोमधील बेरेचिड येथे टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेडच्या (टीएएसएल) अत्याधुनिक संरक्षण उत्पादन सुविधेचे संयुक्तपणे उद्घाटन केले. हा प्रसंग भारत आणि मोरोक्को दरम्यान विकसित होत असलेल्या धोरणात्मक भागीदारीतील एक ऐतिहासिक क्षण असल्याचे ते म्हणाले. 20,000 चौरस मीटरवर स्थित या सुविधेमध्ये टीएएसएल आणि भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) संयुक्तपणे डिझाइन केलेल्या स्वदेशी विकसित व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म (WhAP) 8x8 चे उत्पादन घेतले जाईल.

मोरोक्को सरकारसोबतच्या करारानुसार, टीएएसएल रॉयल मोरोक्को आर्मीला WhAP 8x8 वाहने पुरवेल ज्याची प्रारंभिक डिलिव्हरी पुढील महिन्यात सुरू होणार आहे. ही सुविधा वेळापत्रकाच्या तीन महिने आधीच कार्यान्वित झाली असून उत्पादन आधीच सुरू झाले आहे.
यावेळी बोलताना,राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले की भारताचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन करणे नाही तर अशा क्षमता विकसित करणे आहे ज्यामुळे भारत जगासाठी प्रगत तंत्रज्ञान आणि उच्च-दर्जाच्या उत्पादनांचा विश्वासार्ह स्रोत बनू शकेल. 'मेक इन इंडिया' सोबत, आम्ही 'मेक विथ फ्रेंड्स' आणि 'मेक फॉर द वर्ल्ड' देखील करत आहोत; मोरोक्कोमधील ही सुविधा त्या दृष्टिकोनाचे एक ठळक उदाहरण आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.

मोरोक्कोचे उद्योग आणि व्यापार मंत्री रियाद मेझौर यांच्यासह मोरोक्को सरकार, मोरोक्कोचे सशस्त्र दल, भारत सरकार, भारतीय सशस्त्र दल आणि टीएएसएलचे वरिष्ठ अधिकारी देखील या प्रसंगी उपस्थित होते.

* * *
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2170757)
Visitor Counter : 5