जलशक्ती मंत्रालय
‘स्वच्छता ही सेवा 2025’ उपक्रम राबविण्यासाठी देश सज्ज
‘एक दिन एक घंटा एक साथ’ : 25 सप्टेंबर 2025 रोजी देशभर स्वेच्छा श्रमदान मोहीम
Posted On:
15 SEP 2025 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात नवव्या वेळेस पूर्ण जोमाने स्वच्छता ही सेवा (SHS) 2025 उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 17 सप्टेंबरपासून सुरू होऊन गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणारा हा 15 दिवसांचा उपक्रम देशभरातील लाखो नागरिक स्वच्छता मोहिमांचा लक्षणीय प्रभाव दाखवून देण्याच्या सामूहिक भावनेने एकत्र येऊन कृती करण्यास प्रवृत्त करेल. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) आणि पेयजल आणि स्वच्छता विभाग (DDWS) आणि जल शक्ती मंत्रालयाने संयुक्तपणे सुरू केलेल्या SHS 2025 या उपक्रमाद्वारे आड बाजूच्या, अस्वच्छ आणि दुर्लिक्षित जागांची स्वच्छता करण्यावर मुख्य भर देऊन प्रत्यक्ष जमिनीवर सहजपणे दिसून येईल अशा स्वच्छतेचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी नागरिक, समुदाय आणि संस्थांना एकत्र आणले जाते.
या उपक्रमाच्या पूर्व तयारीचा भाग म्हणून आयोजित कार्यक्रमात बोलताना गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी, SHS 2025 अंतर्गत गतवर्षीप्रमाणे स्वच्छता लक्ष्य युनिट्स (CTUs) केंद्रस्थानी असल्याचे सांगितले. 2024 मध्ये, अशा 8 लाखांहून अधिक CTU स्वछ करून त्यांचे वापरण्यायोग्य सार्वजनिक ठिकाणांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. ते म्हणाले, "ठळकपणे दिसून येण्याजोग्या स्वच्छतेसाठी CTUs ची निवड, परिवर्तन आणि सुशोभीकरण ही कामे जलद गतीने आणि मोहिमेच्या कालावधीच्या नंतरही केली जातील. शहरांमधील आडबाजूची, दुर्लक्षित आणि पोहोचण्यास कठीण असे भाग तसेच कचराकुंड्या, रेल्वे स्थानके, नद्या, गल्ली बोळ अशांसारख्या जास्त कचरा असलेल्या ठिकाणांची CTUs म्हणून निवड करण्यात येत आहे. स्वच्छता आणि सौंदर्य या एकमेकांशी निगडित असल्याने अशा ठिकाणांचा दिसून येण्याजोग्या स्वच्छतेवर थेट परिणाम होतो, असे ते म्हणाले.
कायापालट आणि सुशोभीकरणासाठी दिल्लीच्या भालस्व लँडफिलची निवड करण्यात आली असल्याची केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी घोषणा केली. ते म्हणाले, "कचऱ्याची विल्हेवाट आणि प्रक्रिया करण्याच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी, आपण 17 सप्टेंबर 2025 रोजी प्रशासकांसह भालस्वाला भेट देऊन त्या दिवसापासून आम्ही साफसफाईच्या कामाला सुरूवात करू. जागेची कमतरता लक्षात घेता या ठिकाणचा कचरा पुढील प्रक्रियेसाठी, मी डीडीएला जागेची सोय करण्यासाठी आम्हाला मदत करण्याची विनंती देखील केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली स्वच्छोत्सव या संकल्पनेवर आधारित स्वच्छता ही सेवा 2025 हा उपक्रम म्हणजे सोहळा आणि जबाबदारी यांचा संगम आहे असे केंद्रीय मंत्री सीआर पाटील म्हणाले. स्वच्छता लक्ष्य एककांचे परिवर्तन, सफाई मित्रांची सुरक्षा, हगणदारीमुक्तता, स्वच्छ सुजल ग्राम घोषणा आणि प्लास्टिकमुक्त ग्रामीण गावांसाठी प्रयत्न या स्तंभांवर 'अंत्योदय से सर्वोदय' या दृष्टिकोनाची रचना केली आहे. याद्वारे प्रत्येक गाव आणि शहरामध्ये अगदी शेवटच्या मैलांपर्यंत व्यक्तीचा सन्मान, आरोग्य आणि शाश्वतता यावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले असून 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी हे घटक पूर्व आवश्यकता आहेत. स्वच्छ, आरोग्यदायी आणि हरित भविष्यासाठी भारताचा निर्धार दाखवून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने येत्या 25 सप्टेंबर रोजी अतिशय मनापासून श्रमदानात सहभागी व्हावे असे मी आवाहन करतो, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्र्यांनी नवसारीसह सुरतसाठी 8–10 कोटी रुपयांच्या सफाईमित्र सुरक्षा निधीची देखील घोषणा केली हा निधी सफाईमित्रांचे क्षेमकल्याण आणि त्यांच्या कुटुंबांसाठी शैक्षणिक सहाय्य तसेच व्याजमुक्त कर्जासाठी दिला जाईल.
स्वच्छोत्सव पाच प्रमुख स्तंभांवर आधारित आहे: (i) स्वच्छता लक्ष्य युनिट्स (CTUs) चे रूपांतर - दुर्गम, अंधारी आणि दुर्लक्षित ठिकाणे काढून टाकणे. (ii) स्वच्छ सार्वजनिक स्थळ - सार्वजनिक ठिकाणी सामान्य स्वच्छता आणि स्वच्छता उपक्रम.
(iii) सफाईमित्र सुरक्षा शिबिर – एकल खिडकी सेवा, सुरक्षा आणि आदर शिबिरांद्वारे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांची आरोग्य तपासणी.
(iv) स्वच्छ हरित उत्सव - पर्यावरणपूरक आणि शून्य-कचरा उत्सवांचे आयोजन. (v) स्वच्छतेसाठी जनजागृती - विशेषतः ग्रामीण भारतात हगणदारी मुक्त मॉडेल आणि स्वच्छ सुजल गावाच्या घोषणेसाठी ग्रामसभांवर भर देऊन, जनतेत स्वच्छतेचा संदेश पसरवणे.
स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत, 25 सप्टेंबर 2025 रोजी “एक दिन, एक घंटा, एक साथ ” हा देशव्यापी स्वैच्छिक श्रमदान कार्यक्रम आयोजित केला जाईल. स्थानिक पातळीवर स्वच्छता लक्ष्य युनिट्स (CTUs) चे रूपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी, प्रत्यक्ष श्रमदान आणि प्लॉगिंग मोहिमांवर लक्ष केंद्रित केले जाईल, ज्याचे नेतृत्व नागरिक, राजकीय नेतृत्व, स्वच्छ भारत मिशन (SBM) राजदूत, युवा गट, स्वयंसेवी संस्था, नागरी समाज संघटना (CSO), भागीदार संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रभावशाली व्यक्ती करतील. यावेळी आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये स्थानिक स्वच्छता कामगारांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्याची देखील शिफारस करण्यात आली आहे.
पूर्वतयारी बैठकीचा एक भाग म्हणून, 3 सप्टेंबर 2025 रोजी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) आणि पेयजल आणि स्वच्छता विभाग (DDWS) यांच्यात स्वच्छता ही सेवा (SHS) उपक्रमावर चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर 9 सप्टेंबर 2025 रोजी पेयजल आणि स्वच्छता विभाग आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार
मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसोबत एक पूर्वतयारी बैठक झाली. 10 सप्टेंबर रोजी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली सचिवांच्या समितीची बैठक झाली. सर्व स्तरांवरील (राज्य, जिल्हा, स्थानिक संस्था, मंत्रालये इ.) समन्वय समित्यांची
पहिली बैठक 12 सप्टेंबर रोजी झाली, त्यानंतर पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली सर्व केंद्रीय मंत्रालये आणि क्षेत्रीय युनिट्सच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.
सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2170272)
Visitor Counter : 7