कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय नागरी सेवा (एनपीएस अंतर्गत यूपीएसची अंमलबजावणी) नियम, 2025 - स्वेच्छासेवानिवृत्तीचा पर्याय
Posted On:
16 SEP 2025 12:12PM by PIB Mumbai
निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने 02.09.2025 रोजी अधिकृत राजपत्रात केंद्रीय नागरी सेवा (राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत एकीकृत निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी) नियम, 2025 अधिसूचित केले आहेत, जे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या एनपीएस अंतर्गत पर्याय म्हणून यूपीएस निवडण्याच्या संदर्भात एकीकृत पेन्शन योजनेअंतर्गत लाभांशी संबंधित सेवा बाबींचे नियमन करते.
या नियमांमध्ये इतर गोष्टींबरोबरच 20 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर यूपीएस ची निवड केलेल्यांना स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय प्रदान करण्यात आला आहे.
सेवेची 25 वर्षे पूर्ण केलेल्या पात्र कर्मचाऱ्यांनाच युनिफाइड पेन्शन योजनेअंतर्गत पूर्ण खात्रीशीर रक्कम मिळू शकेल. मात्र 20 वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केल्यानंतर स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय निवडल्यास, प्रोरेटा आधारावर म्हणजेच पात्रता सेवेच्या वर्षाला 25 ने भागले तर येणारी निश्चित रक्कम कर्मचाऱ्यांना खात्रीशीररित्या देय असेल.
सेवानिवृत्तीच्या तारखेपासून निधीची रक्कम देय असेल. याशिवाय इतर फायदे म्हणजे वैयक्तिक निधीच्या 60% अंतिम रक्कम काढणे, प्रत्येक सहा महिन्यांच्या सेवेच्या कालावधीसाठी मूळ वेतनाच्या एक दशांशाव्या भागाचा एकरकमी लाभ आणि महागाई भत्ता, निवृत्ती ग्रॅच्युइटी, लीव्ह एनकॅशमेंट, CGEGIS फायदे निवृत्तीनंतर मिळू शकतात. शिवाय, स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर खात्रीशीर देय निधी मिळण्यापूर्वीच कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत कायदेशीररित्या विवाहित जोडीदाराला सदस्याच्या मृत्यूच्या तारखेपासून कौटुंबिक निवृत्तीवेतन रक्कम दिली जाईल.
***
SushamaKane/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2167128)
अभ्यागत कक्ष : 47