अर्थ मंत्रालय
वित्तीय सेवा विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विमा नियामक विकास प्राधिकरण आणि विमा कंपन्यांच्या प्रमुखांसोबत बैठकीचे आयोजन
Posted On:
15 SEP 2025 10:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2025
वित्तीय सेवा विभागाचे सचिव, एम. नागराजू यांनी आज नवी दिल्ली येथे या विभागाचे, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, प्रमुख खाजगी क्षेत्रातील जीवन विमा आणि बिगर-जीवन विमा कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयुर्विमा परिषद आणि सर्वसामान्य विमा परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली.
3.9.2025 रोजी झालेल्या 56व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत, सर्व वैयक्तिक जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसींवरील जीएसटीतून सूट देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान, सचिवांनी या कर कपातीचा फायदा सध्याच्या आणि नवीन पॉलिसीधारकांना पूर्णपणे मिळत असल्याचे सुनिश्चित करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.
या सुधारणांची माहिती देण्यासाठी आणि विमा अधिक परवडणारा व सामान्य लोकांसाठी सुलभ करण्यासाठी त्यांच्या संभाव्य सकारात्मक प्रभावावर भर देण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचे, वित्तीय सचिवांनी विमा कंपन्यांना निर्देश दिले.
या उपाययोजनांमुळे विमा अधिक सुलभ आणि किफायतशीर होईल, ज्यामुळे आर्थिक सुरक्षा मजबूत होईल आणि देशभरात विम्याची व्याप्ती वाढेल अशी अपेक्षा आहे.
या बैठकीत स्वामिनाथन एस. अय्यर, पूर्णवेळ सदस्य (जीवन), विमा नियामक विकास प्राधिकरण; आर. दोराईस्वामी, सीईओ आणि एमडी, भारतीय आयुर्विमा महामंडळ; गिरिजा सुब्रमण्यम, अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक, न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी; तरुण चुघ, एमडी आणि सीईओ, बजाज आलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड; आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स चे वरिष्ठ प्रतिनिधी आणि इतर प्रमुख विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2167001)
Visitor Counter : 2