रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
विकसित भारत 2047 च्या संकल्पपूर्तीसाठी नितीन गडकरी यांच्याकडून शाश्वत, किफायतशीर व सुरक्षित वाहतुकीचा पथदर्शी आराखडा सादर
शेतकरी ते प्रवासी – जैवइंधन, सार्वजनिक वाहतूक व रस्ता सुरक्षा राष्ट्राच्या प्रगतीशी निगडीत असल्याचे गडकरी यांचे प्रतिपादन
विकासाला गती देण्यासाठी हरित इंधने, सुरक्षित रस्ते आणि सक्षम सार्वजनिक वाहतुकीचे गडकरी यांचे आवाहन
Posted On:
11 SEP 2025 8:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2025
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शाश्वत वाहतूक व्यवस्थेबाबतचा सरकारचा दृष्टीकोन मांडला. ते म्हणाले, “जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वाहन उद्योग असलेल्या भारतात आरामदायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हवेच्या प्रदूषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी आम्ही BS7 व CAFE या जागतिक मानकांचे पालन करू. याशिवाय जैवइंधनाच्या वापरामुळे कच्च्या तेलाची आयात कमी करणे आणि शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ यासाठी चालना मिळते. 3 लाखांपेक्षा जास्त वाहने, स्क्रॅपिंग धोरणाच्या कार्यान्वयानंतर भंगारात काढल्यामुळे उद्योगजगत, सरकार व पर्यावरणालाही लाभ झाला.”
भारतीय वाहन उत्पादक संघाच्या (SIAM) 65 व्या वार्षिक परिषदेत गडकरी आज बोलत होते.विकसित भारत 2047 च्या संकल्पपूर्तीसाठी शाश्वत वाहतूक व्यवस्थेची प्रमुख भूमिका याविषयी प्रमुख उद्योजक आणि धोरणकर्त्यांनी या परिषदेत विचारविनिमय केला.
गडकरी म्हणाले, “या वर्षाच्या अखेरपर्यंत लॉजिस्टिक खर्चाची टक्केवारी कमी होऊन ती दहा टक्क्यांच्या आत असेल. रस्ता सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी जनजागृती व लोकांचे वाहतुकीबाबतचे आचरण सुधारण्यासाठी सामाजिक संस्थांचा सहभाग गरजेचा आहे. रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना ‘राह वीर’ म्हणून 25,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल तसेच जखमींना 1.5 लाख रुपयांपर्यंत विमा प्रदान केला जाईल.”


सोनाली काकडे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2165818)
Visitor Counter : 2