लोकसभा सचिवालय
आत्मनिर्भर भारताच्या परिवर्तनात्मक दृष्टिकोनाने क्रांतिकारी बदल घडवून आणण्यात आले: लोकसभा अध्यक्ष
ॲल्युमेक्स इंडिया 2025 कार्यक्रमाचे लोकसभा अध्यक्षांनी केले उद्घाटन
Posted On:
10 SEP 2025 8:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर, 2025: देशाची मोठी लोकसंख्या, मजबूत औद्योगिक पाया आणि नवोन्मेषाची क्षमता ही देशाची मोठी ताकद असल्याचे सांगत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जागतिक नेता म्हणून भारताचे स्थान उंचावत असल्याचा आज पुनरुच्चार केला. नवी दिल्ली येथे ALUMEX इंडिया 2025- ॲल्युमिनियम एक्सट्रुडेड उत्पादने या विषयावरील जागतिक परिषद आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करताना लोकसभा अध्यक्षांनी हे प्रतिपादन केले.
एमएसएमई क्षेत्र आणि ते चालवणारे लोक ही देशाची सर्वात मोठी संपत्ती बनली आहे,असेही बिर्ला यांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारताच्या परिवर्तनात्मक दृष्टिकोनाने क्रांतिकारी बदल घडवून आणले असून "मेक इन इंडिया" उपक्रमाचे आता दृश्यमान परिणाम सर्वांच्या लक्षात येत असल्याचे ते पुढे म्हणाले.
ALUMEX इंडिया 2025 भारताच्या ॲल्युमिनियम क्षेत्राला बळकट करण्यात, शाश्वत पद्धतींना चालना देण्यात आणि 2047 पर्यंत विकसित, स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर आदरास पात्र ठरेल भारत निर्माण करण्याचे देशाचे ध्येय पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास बिर्ला यांनी व्यक्त केला. ॲल्युमिनियम एक्सट्रुजन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आघाडीच्या कंपन्या, स्टार्ट-अप, व्यापारी आणि उद्योग तज्ञांना एकत्र आणण्यात आले असून त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे दर्शन घडवता यावे, सर्वोत्तम पद्धतींचे आदान-प्रदान व्हावे तसेच ॲल्युमिनियम उद्योगातील भविष्यातील संधींवर विचार विनिमय व्हावा असा उद्देश आहे.
सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2165439)
Visitor Counter : 2