सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (एनसीईएल) आणि कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा ) यांनी सहकार-प्रणित कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी


हा सामंजस्य करार सहकार आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांचे सामर्थ्य समन्वयित करण्याप्रति सरकारची वचनबद्धता अधोरेखित करतो

एनसीईएलचे नेटवर्क अपेडाच्या निर्यात सुविधांशी जोडल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल,ग्रामीण उपजीविकेला चालना मिळेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचे स्थान मजबूत होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, मंत्रालय सहकारी संस्थांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवत आहे

एनसीईएल आणि अपेडा क्षमता निर्मिती , गुणवत्ता अनुपालन, पायाभूत सुविधांना सहाय्य आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग आणि बाजारपेठेतील स्थान यावर लक्ष केंद्रित करतील

एक लवचिक आणि स्पर्धात्मक सहकारी निर्यात परिसंस्था उभारण्याच्या दिशेने हा सामंजस्य करार एक महत्त्वाचे पाऊल आहे

Posted On: 09 SEP 2025 10:09PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2025 

नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (एनसीईएल) आणि कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) यांनी सहकार-प्रणित कृषी निर्यातीला चालना देण्याच्या  उद्देशाने एक  धोरणात्मक भागीदारी करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भुतानी यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला आणि तो सहकार मंत्रालय आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सामर्थ्य समन्वयित  करण्याच्या सरकारची  वचनबद्धता अधोरेखित करतो. अपेडा चे अध्यक्ष  अभिषेक देव आणि एनसीईएल चे व्यवस्थापकीय संचालक  उनूपम कौशिक  यांनी त्यांच्या संघटनांच्या वतीने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या प्रसंगी बोलताना, सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भुतानी म्हणाले की, एनसीईएलचे नेटवर्क अपेडाच्या निर्यात सुविधांशी जोडल्याने शेतकऱ्यांचे  उत्पन्न  वाढेल, ग्रामीण उपजीविकेला चालना मिळेल  आणि नवीन राष्ट्रीय सहकार धोरणाच्या उद्दिष्टांनुसार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचे स्थान मजबूत होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, मंत्रालय सहकारी संस्थांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनानुसार काम करत आहे. ते म्हणाले की, एनसीईएल आणि अपेडा संयुक्तपणे क्षमता निर्मिती आणि प्रशिक्षण, निर्यातीसाठी गुणवत्ता अनुपालन, पायाभूत सुविधांना सहाय्य आणि पुनरुज्जीवन, आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यांमध्ये सहभाग, आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग आणि बाजारपेठेत स्थान निर्माण करणे , मार्केट इंटेलिजन्स  आणि डेटा विश्लेषण आणि वस्तू-निहाय  निर्यात धोरण आखण्यावर  लक्ष केंद्रित करतील.

डॉ. भुतानी म्हणाले की, या सामंजस्य कराराद्वारे, सहकारी संस्थांना संरचित प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळांद्वारे जागतिक दर्जाचे मानके, अन्न सुरक्षा आणि निर्यात दस्तऐवजीकरण याबद्दल महत्वपूर्ण माहिती  मिळेल. ते म्हणाले की, फळे, भाज्या, मसाले, प्रक्रियायुक्त अन्न, तृणधान्ये आणि प्राणीजन्य  उत्पादनांसाठी अनुपालन सुलभ करण्यासाठी अपेडा  चे निर्यात सुविधा प्रयत्न एनसीईएलच्या आउटरीच नेटवर्कबरोबर एकत्रित करता येतील.

सहकार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव  पंकज कुमार बन्सल म्हणाले की, या सामंजस्य करारामुळे एनसीईएलला अपेडाचे तांत्रिक कौशल्य आणि धोरणात्मक पाठबळ मिळते, ज्यामुळे त्यांच्या सदस्यांना निर्यात उत्कृष्टता प्राप्त करण्यास, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यास आणि त्यांच्या उत्पादनांसाठी प्रीमियम मूल्य मिळवण्यास सक्षम केले जाते.

हा सामंजस्य करार एक लवचिक आणि स्पर्धात्मक सहकारी निर्यात परिसंस्था तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. एनसीईएलच्या विस्तृत नेटवर्कसह अपेडाच्या पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ प्रवेश क्षमता एकत्रित करून, ही भागीदारी शेतकरी-समुदायाला  मूर्त आर्थिक लाभ मिळवून  देईल, भारताचा निर्यात पोर्टफोलिओ वाढवेल आणि नवीन राष्ट्रीय सहकार धोरणात कल्पना केल्याप्रमाणे राष्ट्रीय विकासात सहकारी चळवळीचे योगदान मजबूत करेल. सहकारी निर्यातीसाठी राष्ट्रीय संघटना म्हणून एनसीईएलची भूमिका आणि बाजार विकास आणि निर्यात प्रोत्साहन सुलभ करण्यासाठी अपेडाच्या सामर्थ्याचा लाभ घेऊन, ही भागीदारी भारताच्या सहकार क्षेत्रात निर्यात सज्जता , ब्रँडिंग, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि क्षमता निर्मितीला चालना देईल.

 

शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2165116) Visitor Counter : 2