वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरातील स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी डीपीआयआयटी आणि आयसीआयसीआय बँकेदरम्यान सामंजस्य करार

Posted On: 04 SEP 2025 5:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2025

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (डीपीआयआयटी) आणि आयसीआयसीआय बँकेने देशभरातील स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांना पाठबळ देण्यासाठी एक सामंजस्य करार  केला.

या सामंजस्य करारांतर्गत, आयसीआयसीआय बँक एक स्टार्टअप एंगेजमेंट प्रोग्राम अर्थात स्टार्टअप सहभाग कार्यक्रमाची आखणी करून स्टार्टअप इंडिया पोर्टलवर तो सादर केला जाईल. अधिकाधिक सहभाग आणि जागरूकता सुनिश्चित करण्यासाठी हा कार्यक्रम स्टार्टअप इंडियाच्या व्यापक पोहोच आणि दृश्यमानता उपक्रमासह अविरत जोडला जाईल. स्टार्टअप इंडिया आयसीआयसीआय बँकेला संप्रेषण वाढविण्यास, कार्यक्रम दृश्यमानतेचे व्यवस्थापन करण्यास आणि संपूर्ण भारतातील डीपीआयआयटी -मान्यताप्राप्त स्टार्टअप्सशी संबंध सक्षम करण्यास मदत करेल.

या उपक्रमामुळे निवडक स्टार्टअप्सना समर्पित कार्यक्षेत्रासह आयसीआयसीआय बँकेच्या मुंबई-आधारित प्रवेगक सुविधा उपलब्ध होईल. त्यांना संरचित अभ्यासक्रम आणि उद्योग अग्रणींकडून मार्गदर्शनाचा लाभ होईल, तसेच उत्पादन-बाजार अनुरूप प्रमाणित करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवसाय युनिट्ससह पथदर्शी कार्यक्रम चालवण्याच्या संधी मिळतील. हा कार्यक्रम उद्योग-विशिष्ट कार्यशाळा आणि नवोन्मेष प्रदर्शनांमध्ये सहभाग घेण्यास सक्षम करण्याव्यतिरिक्त, व्हेंचर कॅपिटल फर्म्स, गुंतवणूकदार आणि संभाव्य ग्राहकांसह नेटवर्किंग संधी देखील वाढवेल.

उत्पादन-आधारित स्टार्टअप्सना आयसीआयसीआय बँकेच्या प्रवेगक कार्यक्रम, मार्गदर्शन संधी आणि परिसंस्था सहभागाची सुविधा देऊन त्यांच्या वाढीला चालना देणे हा या सहयोगाचा उद्देश आहे. स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या या भागीदारीचा उद्देश सुरुवातीच्या आणि वाढीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना व्यवसाय विकास, उत्पादन सुधारणा आणि कार्यक्षमता परिणामकारक करण्यास समर्थन देणाऱ्या एका अनुकूलित संलग्नता रुपरेषेद्वारे मार्गदर्शन करणे हा आहे.

आयसीआयसीआय बँकेसोबतची भागीदारी म्हणजे स्टार्टअप्ससोबत अर्थपूर्ण सहभागाद्वारे कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करणे होय असे डीपीआयआयटीचे सहसचिव संजीव यांनी यावेळी नमूद केले. ही भागीदारी तंत्रज्ञान आणि अभिनवतेद्वारे भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी काम करणाऱ्या सुरुवातीच्या आणि वाढीच्या टप्प्यातील उद्योजकांसाठी पाठबळाचे नवीन मार्ग प्रशस्त करेल असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

आयसीआयसीआय बँक लिमिटेड (बीएसई: आयसीआयसीआयबीएन, एनएसई: आयसीआयसीआयबीएन आणि एनवायएसई: आयबीएन) ही भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे. 30 जून 2025 रोजी बँकेची एकूण मालमत्ता 21,23,839 कोटी रुपये होती.

 

* * *

निलिमा चितळे/वासंती जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2163756) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu