सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
संसद सदस्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांसाठी एमपीएलएडी योजनेच्या ई-साक्षी पोर्टलबाबत एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे 2 सप्टेंबर 2025 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजन
Posted On:
03 SEP 2025 6:54PM by PIB Mumbai
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (एम ओ एस पी आय) 2 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे संसद सदस्यांच्या स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या (एमपीएलएडी) ई-साक्षी वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशनबाबत एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा विशेषतः संसद सदस्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती जेणेकरून त्यांना ई-साक्षी वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशनची वैशिष्ट्ये, कार्यक्षमता आणि फायदे यांची ओळख करून देता येईल.

एमपीएलएडीयोजनेचे ई-साक्षी वेब पोर्टल एक एकात्मिक डिजिटल मंच उपलब्ध करून देते जे संसद सदस्यांना एमपीएलएडी प्रकल्पांची डिजिटल शिफारस, देखरेख आणि स्थितीचा वेध घेण्यास सक्षम करते. गेल्या वर्षी सदस्यांच्या ई साक्षी पोर्टलसाठी एक मोबाइल ॲप देखील सुरू करण्यात आले होते.

उद्घाटनपर भाषणात एमओएसपीआयचे सचिव डॉ. सौरभ गर्ग यांनी एमपीएलएडी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ई-साक्षी पोर्टल सुरू केल्याने झालेल्या सकारात्मक बदलांचा उल्लेख केला. वाढलेली पारदर्शकता, पूर्णपणे डिजिटल प्रणालीद्वारे प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा, नागरिकांना काम सुचवण्यासाठी नव्याने सुरू केलेली कार्यक्षमता यामुळे योजनेची परिणामकारकता वाढली आहे. व्यवहार्यता तफावत निधीमधील एमपीएलएडी योजनेची ताकद त्यांनी विशद केली आणि मोठ्या परिणामासाठी इतर केंद्रीय योजनांसोबत संलग्न होण्याचे आवाहन केले.
एमओएसपीआयच्या अतिरिक्त सचिव पूजा सिंग मंडोल यांनी आपल्या भाषणात एमओएसपीआयने योजना अधिक प्रभावी होण्यासाठी तसेच खासदारांच्या शिफारशींमागील विकासात्मक हेतू पूर्ण करण्यासाठी वाढीव देखरेखीच्या दृष्टीने हाती घेतलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मंजूर कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता नियमितपणे लक्षात आणून दिली जात आहे. विलंब टाळणे, निधीचा सुयोग्य वेळेचा वापर सुनिश्चित करणे आणि एमपीएलएडीएस अंतर्गत तयार केलेली मालमत्ता लवकरात लवकर सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करून देणे यावर भर देण्यात आला आहे. 1 एप्रिल 2023 नंतर शिफारस केलेली ऑफलाइन कामे अपलोड करण्यासाठी ई-साक्षी पोर्टलवर सादर केलेल्या माजी खासदार मॉड्यूलने सातत्य सुनिश्चित केले आहे आणि खासदारांनी केलेल्या शिफारशींचा परवानगी दिलेल्या कालावधीत योग्य आदर राखला आहे.

या कार्यक्रमात देशभरातील संसद सदस्यांच्या 800 हून अधिक वैयक्तिक कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता, जे एमपीएलडी योजनेशी संबंधित कामांमध्ये त्यांना मदत करण्यात गुंतलेले आहेत.
***
शैलेश पाटील / नंदिनी मथुरे / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2163532)
Visitor Counter : 2