भारतीय स्पर्धा आयोग
सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडमधील मणिपाल हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या 100% पर्यंत भागभांडवलाच्या अधिग्रहण प्रस्तावाला सीसीआयची मंजुरी
Posted On:
02 SEP 2025 6:44PM by PIB Mumbai
सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडमधील मणिपाल हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या 100% पर्यंत भागभांडवलाच्या अधिग्रहण प्रस्तावाला भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) मंजुरी दिली आहे.
मणिपाल हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड (अधिग्रहण) ही मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड (एमएचईपीएल) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. 'मणिपाल हॉस्पिटल्स' या ब्रँड नावाने मल्टी स्पेशालिटी सेवा पुरवणाऱ्या रुग्णालयांचे जाळे (त्याच्या संलग्न संस्थांसह) चालवणारे 'एमएचईपीएल' भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत आहे.
सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड (टार्गेट) ही महाराष्ट्रात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चेन चालवते, जी सर्वसमावेशक तृतीयक आणि चतुर्थक आरोग्य सेवा प्रदान करते. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, कराड यांसारख्या शहरांमध्ये अनेक एकके असून, सर्व सुविधांनी युक्त अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रस्तावित भागीदारीमध्ये लक्ष्यित अधिग्रहणकर्त्याद्वारे अनेक हप्त्यांमध्ये 100% पर्यंत भागभांडवल अधिग्रहण करणे समाविष्ट आहे.
आयोगाचा सविस्तर आदेश नंतर जारी केला जाईल.
***
माधुरी पांगे / वासंती जोशी / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163192)
Visitor Counter : 7