अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अकाउंट अ‍ॅग्रीगेटर व्यवस्था  या भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेला चार वर्षे पूर्ण


112 वित्तीय संस्था वित्तीय माहिती प्रदाते (एफआयपी) आणि वित्तीय माहिती वापरकर्ते (एफआययू) म्हणून कार्यरत आहेत, तर 56 केवळ FIP म्हणून कार्यरत आहेत आणि 410 एफआययू म्हणून कार्यरत आहेत

2.2 अब्जहून अधिक वित्तीय खाती आता अकाउंट अ‍ॅग्रीगेटर व्यवस्थेद्वारे सुरक्षित, संमती-आधारित डेटा-सामायिकीकरण करत आहेत तर 112.34 दशलक्ष वापरकर्त्यांनी आधीच त्यांची खाती संलग्न केली आहेत

Posted On: 02 SEP 2025 9:14AM by PIB Mumbai

 

अकाउंट अ‍ॅग्रीगेटर (AA) व्यवस्था 2, सप्टेंबर 2021 रोजी अधिकृतपणे सुरु करण्यात आली. यामुळे आर्थिक डेटा सामायिक करण्यासाठी  एक सुरक्षित, संमती-आधारित व्यवस्था स्थापित झाली. 2016 मध्ये, रिझर्व्ह बँकेने अकाउंट अ‍ॅग्रीगेटर (AA) व्यवस्थेसाठी प्रमुख मार्गदर्शक तत्वे जारी केली होती.

AA व्यवस्था वापरकर्त्यांना अनेक स्त्रोतांमधून त्यांची आर्थिक माहिती (जसे की बँक खाती, गुंतवणूक, कर्जे इ.)  एकत्रित करण्याची आणि कर्ज मिळवणे  किंवा आर्थिक नियोजन यासारख्या सेवांसाठी सेवा प्रदात्यांबरोबर (उदा. कर्ज देणारे, संपत्ती व्यवस्थापक) सामायिक करायला परवानगी देते. AA मध्यस्थ म्हणून काम करते आणि एन्क्रिप्टेड, संमती आधारित डेटा सामायिकीकरणाद्वारे माहितीची  गोपनीयता आणि वापरकर्ता नियंत्रण अबाधित राहील याची काळजी घेते.

2023 मध्ये भारताच्या जी 20 अध्यक्षतेदरम्यान , AA ला एक मूलभूत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय ) म्हणून मान्यता देण्यात आली जी डेटा एक्सचेंज लेयर म्हणून काम करते आणि ओळख (आधार) आणि पेमेंट (युपीआय ) लेयरला पूरक आहे. "डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे आर्थिक समावेशकता आणि उत्पादकता वाढीला चालना देण्यासाठी धोरणात्मक  शिफारसी" (2023) यासह प्रमुख जी 20 दस्तावेजांमध्ये  AA ची भूमिका आणि प्रभाव याला मान्यता देण्यात आली आहे.  "डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवरील भारताच्या जी 20 कृतीदलाचा अहवाल" (जुलै 2024) मध्ये देखील याचे महत्व सविस्तरपणे नमूद केले आहे.".

तेव्हापासून, ही व्यवस्था  वेगाने अंमलात आली आणि बँकिंग, सिक्युरिटीज, विमा आणि निवृत्तीवेतन सारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्याचा  वेगाने अवलंब होत आहे, ज्यामुळे भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा बळकट झाली  आहे. आजपर्यंत, 112 वित्तीय संस्था वित्तीय माहिती प्रदाते (एफआयपी) आणि वित्तीय माहिती वापरकर्ते (एफआययू) म्हणून कार्यरत आहेत, तर 56 केवळ FIP म्हणून कार्यरत आहेत आणि  410 एफआययू म्हणून कार्यरत आहेत.  2.2 अब्जहून अधिक वित्तीय खाती आता अकाउंट अ‍ॅग्रीगेटर व्यवस्थेद्वारे सुरक्षित, संमती-आधारित डेटा-सामायिकीकरण करत आहेत तर 112.34 दशलक्ष वापरकर्त्यांनी आधीच त्यांची खाती संलग्न  केली आहेत, ज्यातून या परिवर्तनकारी उपक्रमाची व्याप्ती आणि वाढता विश्वास अधोरेखित होतो.

एए व्यवस्था औपचारिक कर्ज मिळवणे सुलभ बनवण्यासाठी  विशेषतः एमएसएमई आणि वैयक्तिक कर्जासाठी नवीन संधी खुल्या करून देण्यास सज्ज असून विकसित भारत @2047 च्या दिशेने भारताच्या प्रवासात अर्थपूर्ण योगदान देत आहे.

प्रारंभ  आणि घटनाक्रम : भारतीय रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे  (2016):

https://www.rbi.org.in/scripts/BS_ViewMasDirections.aspx?id=10598

Ecosystem Reach & Participants: Accounts, FIU and FIP (October 2024): https://financialservices.gov.in/beta/en/account-aggregator-framework

***

सोनल तुपे / सुषमा काणे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2163077) Visitor Counter : 5