वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उद्योगांनी विकासाकरता धाडसी उद्दिष्टे ठेवावीत आणि सरकारच्या संशोधन विकास आणि नवोन्मेष योजनेचा लाभ घ्यावा, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे जागतिक मेडटेक शिखर परिषदेत आवाहन

Posted On: 29 AUG 2025 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2025

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज 17 व्या सीआयआय जागतिक  मेडटेक (वैद्यकीय तंत्रज्ञान) शिखर परिषदेला संबोधित केले. उद्योग क्षेत्राने विकासासाठी धाडसी उद्दिष्टे ठेवावीत आणि गतिमान भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारच्या संशोधन विकास आणि नवोन्मेश योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारतीय मेडटेक उद्योगाची, विशेषतः कोविड-19 महामारीच्या  काळातील विकास आणि लवचिकतेची त्यांनी प्रशंसा केली. भारताला आरोग्यसेवेत आत्मनिर्भर  बनवण्यात या क्षेत्राने दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली, आणि परवडण्याजोगी, उच्च दर्जाची वैद्यकीय उपकरणे पुरवण्यात जागतिक स्तरावर अग्रेसर होण्याचे आवाहन केले.

मेडटेक उद्योगाने आयात वस्तूंची बाजारपेठ या ऐवजी उत्पादन आणि नवोन्मेशाचे जागतिक केंद्र बनावे, असे आवाहन गोयल यांनी केले. ते म्हणाले की, आपण आपल्या पुरवठा साखळ्या सुरक्षित करून निर्यात बाजारपेठा निर्माण करणे गरजेचे आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी परवडणारी, उच्च-गुणवत्तेची वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी संशोधन आणि विकासावर  लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

मेडटेक कंपन्यांसाठी अधिक व्यवसायाभिमुख वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकार  नियामक प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे, तसेच सुरक्षितता आणि गुणवत्तेशी तडजोड न करता जलद मंजुरी सुनिश्चित करत आहे, असे गोयल म्हणाले. उद्योग, शिक्षण तज्ज्ञ  आणि संशोधन संस्था यांच्यात अधिक सहकार्य वाढवण्यासाठी, मेडटेक क्षेत्रातील  संशोधन आणि विकासाला समर्थन द्यायला हवे, तसेच त्यासाठी सरकारी निधीची उपलब्धता वाढवायला हवी, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भारतात पुढील पिढीची वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी उद्योग क्षेत्राने  देशांतर्गत उत्पादन आणि संशोधन आणि विकासामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले. या क्षेत्राच्या महत्त्वाकांक्षी विकास योजनांना पाठबळ देऊ शकणारे प्रतिभावान मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकासाच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि रुग्ण कल्याणावर या क्षेत्राने लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

गोयल यांनी किफायतशीर  किंमत आणि दर्जा या प्रमुख संदेशाचा पुनरुच्चार केला, आणि मेडटेक नवोन्मेश, समाजाच्या सर्व घटकांसाठी उपलब्ध असायला हवा, यावर भर दिला. भारत आणि जगासाठी उच्च-गुणवत्तेचे, परवडणारे आरोग्य सेवा उपाय प्रदान करण्याच्या मेडटेक क्षेत्राच्या प्रवासाला पाठबळ देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. ‘निरोगी भविष्यासाठी नवोन्मेश- जागतिक प्रभावाच्या  दिशेने मेडटेकची आगेकूच’, या संकल्पनेवर चर्चा करण्यासाठी, 17 व्या सीआयआय ग्लोबल मेडटेक शिखर परिषदेच्या व्यासपीठावर धोरणकर्ते, नवोन्मेशी, उद्योग क्षेत्रातील धुरीण, संशोधक आणि चिकित्सक एकत्र आले.

सोनाली काकडे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2162103) Visitor Counter : 17
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil