युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते हॉकी आशिया कप 2025 चषकाचे अनावरण
बिहारमधील राजगीर येथे चौथ्या ऐतिहासिक जेतेपदावर यजमान भारताचे लक्ष
Posted On:
25 AUG 2025 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2025
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा व कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी सोमवारी हॉकी पुरुष आशिया कप 2025 च्या लखलखत्या चषकाचे अनावरण केले. या स्पर्धेच्या 12 वी आवृत्ती जवळ आली असून ही स्पर्धा 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर हॉकी स्टेडियमवर होणार आहे.
राजगीर आवृत्ती ऐतिहासिक ठरणार आहे, कारण बिहारमध्ये आयोजित केलेली ही पहिलीच मोठी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा असून यामुळे राज्याचा वाढता क्रीडा दर्जा आणखी उंचावणार आहे.
सोमवारी संध्याकाळी झालेल्या चषक अनावरण प्रसंगी तीन वेळचा ऑलिंपिक पदक विजेता हरबिंदर सिंग, 1972 च्या ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेता अशोक ध्यानचंद, 1980 च्या मॉस्को ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेता जफर इक्बाल तसेच बिहार राज्य सरकारचे आणि हॉकी इंडियाचे अधिकारी उपस्थित होते.
या वर्षीचा आशिया कप हा नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये होणाऱ्या 2026 च्या एफ आय एच पुरुष हॉकी विश्वचषकासाठीची थेट पात्रता फेरी म्हणूनही काम करेल. स्पर्धेतील विजेत्या संघाला आपसूकच स्थान मिळणार असून दुसऱ्या ते सहाव्या स्थानावर असलेले संघ पुढील वर्षीच्या विश्वचषक पात्रता फेरीत प्रवेश करतील.



* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2160764)