भारतीय निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांसोबत व्यापक संरचित संवाद जारी
Posted On:
25 AUG 2025 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2025
- निवडणूक आयोग गेल्या सहा महिन्यांपासून सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत संरचित पद्धतीने अनेक बैठका घेत आहे. सर्व स्तरांवरील राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांसोबत रचनात्मक चर्चेची दीर्घकाळापासून गरज पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने हे कार्य हाती घेतले आहे.
- मार्च 2025 मध्ये झालेल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (सीईओ) परिषदेत निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या उपस्थितीत मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी या बैठकांची संकल्पना मांडली होती. त्यानुसार, सर्व राजकीय पक्षांसोबत 4,719 संरचित बैठका घेण्यात आल्या त्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत एकूण 40 बैठका, डीईओंसह 800 बैठका आणि ईआरओंसह 3,879 बैठका झाल्या;ज्यात विविध राजकीय पक्षांचे 28,000 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.
- त्यानंतर,मे 2025 मध्ये सर्व 6 मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते आणि आयोगाने 5 राष्ट्रीय पक्षांच्या पक्षप्रमुखांसोबत/अधिकृत प्रतिनिधींसोबत बैठका घेतल्या आहेत (त्यांचे तपशील सोबतच्या यादीत जोडलेले आहेत). या बैठकांमुळे पक्षप्रमुखांना त्यांच्या सूचना आणि चिंता संबंधात आयोगाशी थेटपणे सामायिक चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले.या बैठका निवडणूक आयोगाच्या इतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी मंडळांसोबत त्यांच्या विनंतीनुसार झालेल्या बैठकींव्यतिरिक्त आयोजित अशा या बैठका आहेत.
- त्यानंतर, आयोगाने जुलै आणि ऑगस्ट 2025 मध्ये 17 मान्यताप्राप्त राज्यस्तरीय राजकीय पक्षांशी देखील संवाद साधला आहे (त्यांचा तपशील पुढे जोडले आहे). उर्वरित राजकीय पक्षांशी बैठकीसंदर्भात प्रक्रिया सुरू आहे.
- या सक्रिय बैठका हा आयोगाचा एक नवीन उपक्रम आहे आणि राजकीय पक्षांशी संवाद साधण्याच्या पूर्वीच्या पद्धतीपासून तो वेगळा आहे.
- हा उपक्रम सर्व संबंधितांसह विद्यमान कायदेशीर चौकटीनुसार निवडणूक प्रक्रिया अधिक मजबूत करण्याच्या आयोगाच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
* * *
निलिमा चितळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2160723)