नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
इरेडाचा नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयासमवेत कामगिरी आधारित सामंजस्य करार, 2025-26 या आर्थिक वर्षात 8,200 कोटी रुपयांच्या महसूलाचे लक्ष्य
Posted On:
25 AUG 2025 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2025
भारतीय नविकरणीय उर्जा विकास एजन्सी लिमिटेड म्हणजे (इरेडा) इरेडाने आज भारत सरकारच्या अक्षय आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयासोबत(एमएनआरई) कामगिरीवर आधारित एक सामंजस्य करार केला असून त्याद्वारे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी धोरणात्मक उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
एमएनआरई आणि इरेडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील अटल अक्षय ऊर्जा भवन येथे एमएनआरईचे सचिव संतोष कुमार सारंगी आणि इरेडा चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या सामंजस्य करारांतर्गत, सरकारने परिचालना द्वारे आर्थिक वर्ष 2024-25, साठी ₹8,200 कोटी रुपयांचे महसूल लक्ष्य निश्चित केले आहे. इरेडा ने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 6,743.32 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त करत 5,957 कोटी रुपयांचे महसूल लक्ष्य ओलांडले होते. या सामंजस्य करारात अनुत्पादित मालमत्ता ते एकूण कर्ज, मालमत्ता उलाढालीचे प्रमाण आणि ईबीटीडीए यासारखे प्रमुख कामगिरी मापदंड देखील समाविष्ट आहेत.
कंपनी विकासाच्या मार्गावर असल्याबद्दल विश्वास व्यक्त करताना, इरेडा चे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास म्हणाले: “या वर्षीही उत्कृष्ट कामगिरी जारी रहाण्याची आशा बाळगून, आम्ही उत्कृष्टतेची आमची प्रतिबद्धता टिकवून ठेवण्यासाठी वचनबद्ध आहोत. इरेडा ने आर्थिक वर्ष 2020-21 पासून सलग चार वर्षे सामंजस्य करार करत 'उत्कृष्ट' श्रेणी कायम राखली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 सामंजस्य करार मानांकना साठी, इरेडा, एनबीएफसी आणि ऊर्जा क्षेत्रात अव्वल कामगिरी करणारी आस्थापना म्हणून उदयास आली आहे.
* * *
निलिमा चितळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2160644)