लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे येत्या 5 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान बार्बाडोसमधील ब्रिजटाउन इथे होणाऱ्या 68 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत भारताच्या संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार

Posted On: 24 AUG 2025 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 ऑगस्‍ट 2025

 

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे येत्या 5 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान बार्बाडोसमध्ये ब्रिजटाउन इथे होणाऱ्या 68 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत  भारताच्या संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत.

या संदर्भात आज बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवन परिसरात आंतर-मंत्रालयीन बैठक झाली. या बैठकीत विविध मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांनी देशभरातील विधिमंडळांच्या पीठासीन अधिकाऱ्यांना परिषदेच्या विविध कार्यक्रमांबद्दल माहिती दिली.
या परिषदेत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला  आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या व्यतिरिक्त, देशभरातील राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी आणि सचिव भारतीय क्षेत्राअंतर्गच्या राष्ट्रकुल संसदीय संघटनेचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

68 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रकुल: एक जागतिक भागीदार (द कॉमनवेल्थ: अ ग्लोबल पार्टनर) या विषयावरील सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला ओम बिरला संबोधित करणार आहेत.

सर्वसाधारण सभा आणि कार्यशाळांव्यतिरिक्त या परिषदेत, प्रगतीसाठी सुरक्षित आणि स्वतंत्र राहून उन्नती करणे : टोळ्यांचा हिंसाचार ते  सायबर छळांसारख्या आधुनिक आव्हानांवर मात करण्यासाठी युवा वर्गाचे सक्षमीकरण करणे  - (Staying Safe and Free to Thrive: Empowering Young People to Overcome Modern Challenges - From Gang Violence to Cyber-Bullying) या विषयावर एक युवा गोलमेज परिषद देखील होणार आहे.

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2160401)
Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi