संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे अल्जेरिया दौऱ्यासाठी प्रस्थान

Posted On: 24 AUG 2025 1:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 ऑगस्‍ट 2025

 

लष्करप्रमुख (सीओएएस) जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 25 ते 28 ऑगस्ट 2025 दरम्यानच्या अल्जेरियाच्या अधिकृत भेटीसाठी प्रस्थान केले आहे. भारताचे राष्ट्रपती आणि संरक्षणसेना प्रमुख यांच्या अलीकडील भेटींनंतर लगेचच ही भेट होत असल्याने भारत-अल्जेरिया संबंध दृढ करण्याला देण्यात आलेले  महत्त्व यातून अधोरेखित होते.

या भेटीचा उद्देश भारत आणि अल्जेरिया यांच्यातील संरक्षण व सुरक्षा सहकार्य अधिक बळकट करणे हा आहे. यात लष्करा अंतर्गत सहकार्य वाढवणे, प्रादेशिक व जागतिक सुरक्षा आव्हानांवरील दृष्टिकोन सामायिक करणे आणि संरक्षण उद्योग सहकार्याच्या संधी शोधणे यावर भर असेल.

या भेटीत जनरल द्विवेदी हे अल्जेरियाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी उच्चस्तरीय बैठका घेतील. यात जनरल सईद शानेग्रीहा, संरक्षणमंत्री प्रतिनिधी व पीपल्स नॅशनल आर्मीचे लष्करप्रमुख; लेफ्टनंट जनरल मोस्तेफा स्माली, स्थलसेना कमांडर; आणि भारताच्या अल्जेरियातील राजदूत डॉ. स्वाती कुलकर्णी यांचा सहभाग असेल. ते तामेंतफोस्त येथील स्कूल ऑफ कमांड अँड मेजर स्टाफ, शेरशेल मिलिटरी अकादमी यांसारख्या महत्त्वाच्या लष्करी संस्थांना भेट देतील तसेच शहीद स्मारकाला अभिवादनही करतील.

या भेटीपूर्वी भारतीय संरक्षण उद्योगांनी 30 जुलै ते 01 ऑगस्ट 2025 दरम्यान अल्जियर्स येथे आयोजित संरक्षण परिषदेमध्ये आपली क्षमता प्रदर्शित केली होती. यामुळे संरक्षण उद्योग व तंत्रज्ञान सहकार्याची पायाभरणी झाली आहे.

लष्करप्रमुखांची ही भेट या दोन देशांतील ऐतिहासिक संबंधांना अधिक बळकट करेल आणि सामायिक सुरक्षा हितसंबंध, प्रादेशिक स्थैर्य व संरक्षण सहकार्य पुढे नेण्यास गती देईल अशी अपेक्षा आहे.

 

* * *

आशिष सांगळे/नितिन गायकवाड/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2160285)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil