संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदल जहाज ‘कदमत्त’ चा सुराबाया बंदरातील दौरा पूर्ण

Posted On: 23 AUG 2025 7:29PM by PIB Mumbai

 

स्वदेशी बनावटीची पाणबुडीविरोधी युद्धनौका (ASW corvette) आयएनएस कदमत्तने इंडोनेशियातील सुराबाया बंदराचा तीन दिवसांचा दौरा यशस्वीपणे पूर्ण केला. या दौऱ्यामुळे भारतीय नौदल आणि इंडोनेशियन नौदल  यांच्यातील मैत्री, विश्वास आणि परस्पर कार्यक्षमतेचे संबंध अधिक दृढ झाले.

या भेटीदरम्यान, समुद्री सहकार्य आणि परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी व्यावसायिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये व्यावसायिक संवाद आणि क्रॉस-डेक भेटींचा समावेश होता, ज्यामुळे दोन्ही नौदलांच्या कार्यक्षमतेचा परस्परांशी ताळमेळ (operational synergy) वाढण्यास मदत झाली.

जहाजावरील कर्मचाऱ्यांनी जहाजावर एकत्रित योग सत्रात आणि टीएनआय एएल (TNI AL) कर्मचाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण व्हॉलीबॉल सामन्यात भाग घेतला, ज्यामुळे बंधुता आणि सहकार्याची भावना दिसून आली.

समुदाय संपर्काचा एक भाग म्हणून, जहाजाने इंडोनेशियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना जहाजाला भेट देण्याची आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली. याव्यतिरिक्त, वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांसोबतच्या सौजन्य भेटींनी या प्रदेशात सुरक्षित आणि स्थिर सागरी क्षेत्राची खात्री देण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या एकत्रित प्रयत्नांवर भर दिला.

आयएनएस कदमत्तच्या भेटीने या प्रदेशातील भारताची भूमिका एक पसंतीचा संरक्षक भागीदार म्हणून पुन्हा एकदा सिद्ध झाली आणि 'पार्टनरशिप अक्रॉस सी' (Partnership Across Sea) या सामायिक दृष्टिकोनाखाली भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील दीर्घकाळची सागरी भागीदारी अधिक मजबूत झाली.

***

सुषमा काणे/शैलेश पाटील/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2160242)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil