सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
दिव्यांग व्यक्तीं सक्षमीकरण विभाग, निपमन फाउंडेशन आणि यंग लीडर्स फॉर अॅक्टिव्ह सिटीझनशिप करणार ब्रेकिंग बॅरियर्स फेलोशिप या छात्रवृत्तीचा आरंभ.
Posted On:
21 AUG 2025 10:03AM by PIB Mumbai
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्तीं सक्षमीकरण विभागाने (DEPwD) निपमन फाउंडेशन आणि यंग लीडर्स फॉर अॅक्टिव्ह सिटीझनशिप (YLAC) या संस्थांसोबत ब्रेकिंग बॅरियर्स फेलोशिप ही छात्रवृत्ती सुरू करण्यासाठी एक सामंजस्य करार (MoU) केला आहे, धोरणात्मक पाठिंबा मजबूत करण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाच्या कार्यालयांमध्ये युवा व्यावसायिकांना नियुक्त करण्यासाठी आणि अपंग व्यक्तींचे हक्क (RPwD) कायदा 2016 च्या अंमलबजावणीला चालना देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाचे संचालक आशिष ठाकरे; निपमन फाउंडेशनचे संस्थापक निपुण मल्होत्रा आणि यंग लीडर्स फॉर अॅक्टिव्ह सिटीझनशिपचे सह-संस्थापक रोहित कुमार यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी दिव्यांग व्यक्तीं सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल आणि अतिरिक्त सचिव मनमीत कौर नंदा उपस्थित होते.
छात्रवृत्तीचे उद्दिष्ट:
- व्यावसायिक पाठिंब्याच्या आधारे दिव्यांग व्यक्तीं सक्षमीकरण विभागाची क्षमता वृद्धी करणे.
- छात्रांना मार्गदर्शन आणि सरकारी कामकाजाचा अनुभव प्रदान करणे
- धोरणनिर्मितीमध्ये दिव्यांगत्वासंबंधी नवीन दृष्टिकोन समाविष्ट करणे.
हा सहयोगी कार्यक्रम एक वर्षाच्या मुदतीसाठी असून परस्पर सहमतीने मुदतवाढ करता येईल. यामध्ये पारदर्शकता, बुद्धिमत्तेवर आधारित छात्रांची निवड, तिमाही अहवाल यावर भर असेल आणि अधिकृत गुपिते कायदा 1923 अंतर्गत गोपनीयता बाळगली जाईल.
युवा नेतृत्वाला समृद्ध करणे आणि भारतात दिव्यांगांच्या सक्षमतेत वाढ करून सर्वसमावेशक प्रशासनाचा अंगीकार करण्यासाठीची दिव्यांग व्यक्तीं सक्षमीकरण विभाग आणि त्यांच्या भागीदारांची वचनबद्धता या छात्रवृत्ती उपक्रमातून दिसून येते.
***
NanaMeshram/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2158936)