आयुष मंत्रालय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जयपूर स्थित राष्ट्रीय आयुर्वेद संस्था (एनआयए) ची दुसरी बैठक संपन्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयुष क्षेत्रात ऐतिहासिक प्रगती दिसून येत आहे - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
Posted On:
20 AUG 2025 10:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2025
केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे जयपूर स्थित राष्ट्रीय आयुर्वेद संस्था (एनआयए) ची दुसरी बैठक पार पडली.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, "राष्ट्रीय आयुर्वेद संस्था एक जागतिक उत्कृष्टता केंद्र म्हणून विकसित करणे हे आमचे ध्येय असून प्रगत संशोधन, नवोन्मेष , दर्जेदार शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य नेतृत्वाचे ते प्रतीक राहील. या संस्थेने केवळ उत्कृष्टता साध्य न करता देश आणि जगभरातील इतर आयुर्वेदिक संस्थांना देखील प्रेरित करावे.
ही बैठक केवळ प्रशासकीय औपचारिकता नव्हती तर पारंपारिक औषध प्रणालींच्या जागतिक उदयाला अनुरूप संस्थेची भविष्यातील दिशा निश्चित करण्यासाठी एक व्यासपीठ होते यावर त्यांनी भर दिला .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आयुष क्षेत्राने ऐतिहासिक प्रगती केली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारतात पारंपरिक औषधांसाठी WHO जागतिक केंद्राची स्थापना ही भारतीय ज्ञान प्रणालींना मिळालेली जागतिक मान्यता आहे जी जगभरात आशा आणि आत्मविश्वासाने स्वीकारली जात आहे.
राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेची कामगिरी:
भारतातील आयुष क्षेत्रातील पहिले अभिमत विद्यापीठ.
वर्षाला 4 लाखांहून अधिक ओपीडी रुग्ण आणि 25,000+ आयपीडी रुग्णांवर उपचार केले जातात.
एससी, एसपी आणि एसटीपी योजनांअंतर्गत 12 जिल्ह्यांमध्ये मोफत आरोग्यसेवा शिबिरे.
जीएमपी-प्रमाणित फार्मसी 100 हून अधिक आयुर्वेदिक औषधे तयार करते.
एनएएसी ' ए ' ग्रेड, एनएबीएच आणि एनएबीएल ची प्रशंसा मिळवली आहे.
15 देशांमधील विद्यार्थी एनआयएमध्ये शिक्षण घेत आहेत.
नुकतेच एनसीआयएसएमने भारतातील सर्वोत्तम आयुर्वेदिक संस्था म्हणून घोषित केले.
आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कामगिरीमुळे त्याची जागतिक प्रतिष्ठा वाढली आहे.
सरकारच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार करत त्यांनी सांगितले की, ही संस्था राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेदाचा अभिमान वृद्धिंगत करत रहावी यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास आयुष मंत्रालय पूर्णपणे वचनबद्ध आहे.



निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2158743)