आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीसीआरएएस आणि डब्ल्यूएचओ (सीईएआरओ) यांनी मुंबईत हर्बल औषधांसाठी डब्ल्यूएचओ-जीएमपी विषयक प्रादेशिक कार्यशाळेचे केले आयोजन


हर्बल औषधांच्या उत्कृष्ट उत्पादन पद्धतींवरील 4 दिवसांच्या प्रशिक्षणात आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग

डब्लूएचओ’च्या प्रतिनिधींनी जीएमपी मानकांनुसार दर्जेदार हर्बल औषधे तयार करण्यात भारताच्या नेतृत्वाची केली प्रशंसा

Posted On: 19 AUG 2025 10:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2025

आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने (सीसीआरएएस) जागतिक आरोग्य संघटना-दक्षिण-पूर्व आशिया प्रादेशिक कार्यालय (डब्लूएचओ - सीईएआरओ) यांच्या सहकार्याने चार दिवसांची "हर्बल औषधांसाठी डब्लूएचओ उत्कृष्ट उत्पादन पद्धती (GMP)” या विषयावर चार दिवसीय प्रादेशिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा 19 ते 22 ऑगस्ट 2025 दरम्यान मुंबईतील आरआरएपी - केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था (आरआरएपी -सीएआरआय) येथे आयोजित केली जात आहे.

कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेचे महासंचालक प्रो. रविनारायण आचार्य; डब्लूएचओ - सीईएआरओ चे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन गोदाटवार; आणि इमामी इंडियाचे माजी संचालक डॉ. सी.के. कटियार यांच्या हस्ते झाले. सीसीआरएएस, डब्ल्यूएचओ, पीसीआयएम अँड एच आणि आरआरएपी-सीएआरआय मधील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

डब्ल्यूएचओ-एसीएआरओच्या प्रभारी अधिकारी डॉ. कॅथरीना बोहेम यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे मेळाव्याला संबोधित केले. बोहेम यांनी आपल्या संदेशात पारंपरिक औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या हर्बल औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता सुनिश्चित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यशाळेत भूतान, थायलंड, श्रीलंका, नेपाळ यासह आग्नेय आशियाई देशांतील सुमारे 19 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी तसेच भारतीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. चार दिवसांच्या या कार्यशाळेत जीएमपी आणि जीएलपीमधील तज्ञांच्या सत्रांसह सहा मॉड्यूलसाठी व्याख्याने विविध तांत्रिक सत्रे आयोजित करण्याचे उद्दिष्ट आहे. या तज्ञांच्या पॅनेलमध्ये सीडीएससीओ चे माजी उपायुक्त डॉ. सुदीप्त डे आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) चे माजी संचालक डॉ. सत्यब्रत मैती यांचा समावेश आहे. याशिवाय, हर्बल औषधांच्या दोन डब्ल्यूएचओ-जीएमपी प्रमाणित फार्मास्युटिकल युनिट्स आणि सिल्वासा (दमण) येथील इमामी, गुजरातमधील अमाबच येथील झंडू एफएचसी फार्म्स यांना प्रत्यक्ष भेटी आयोजित करण्यात आले आहेत.

आपल्या उद्घाटनाच्या भाषणात, जागतिक आरोग्य संघटनेचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन गोदाटवार म्हणाले की, आग्नेय प्रदेशातील देशांमध्ये भारताने जीएमपी उत्पादन युनिट्समध्ये सर्वोत्तम दर्जाची आणि प्रभावी हर्बल औषधे तयार करण्याच्या प्रयत्नांचे प्रदर्शन करण्यासाठी भारताने ही कार्यशाळा आयोजित केली आहे तयार करण्यात आली आहे. पीसीआयएम ॲन्ड एच चे संचालक डॉ. रमण सिंग यांनी सहभागी प्रतिनिधींना या क्षेत्रातील अलिकडच्या घडामोडी आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या आणि नुकत्याच संपलेल्या डब्ल्यूएचओ - आयआरसीएच कार्यशाळेबद्दल माहिती दिली.

ही कार्यशाळा आयुष मंत्रालयाच्या गुणवत्तापूर्ण औषध विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक बळकट करेल.  

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2158200)
Read this release in: English