आयुष मंत्रालय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची पहिली बैठक
Posted On:
19 AUG 2025 9:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2025
आयुष मंत्रालयासाठी संसदीय सल्लागार समितीची बैठक आज नवी दिल्ली येथे झाली. आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. लोकसभा आणि राज्यसभेतील विविध राजकीय पक्षांचे खासदार या संसदीय समितीच्या बैठकीला उपस्थित होते.
संसदीय सल्लागार समितीच्या सदस्यांमध्ये डॉ. स्वामी सच्चिदानंद हरी साक्षी, डॉ.लक्ष्मीकांत बाजपेयी, ज्योत्स्ना सी महंत, धर्मशीला गुप्ता, पुरुषोत्तम रुपाला, अष्टीकर पाटील नागेश बापुराव, ज्योतिर्मय सिंह महातो, लवू श्रीकृष्ण देवरायलू, सदानंद म्हाळू शेट तानवडे, बाबुभाई जेसंगभाई देसाई आणि कृष्ण प्रसाद टेन्नेटी यांनी या बैठकीत भाग घेतला.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी एका महत्त्वपूर्ण घडामोडीवर प्रकाश टाकताना नमूद केले की, आयुष मंत्रालयाची निर्मिती 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असे स्वतंत्र मंत्रालय झाल्यानंतर प्रथमच एक समर्पित संसदीय सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, समिती तयार केल्यामुळे विशिष्ट विषय केंद्रित चर्चा होऊ शकेल आणि आयुषशी संबंधित बाबींवर चांगले लक्ष दिले जाईत तसेच दिशा सुनिश्चित करण्यासाठी मजबूत धोरण तयार करण्यासाठी मदत मिळेल. यामुळे अधिक समग्र आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आरोग्य सेवा प्रणालीला चालना देण्यात मंत्रालयाची भूमिका आणखी वाढण्यास मदत होईल.
या बैठकीदरम्यान, खासदार पुरुषोत्तम रुपाला यांनी आयुष मंत्रालयाने पोस्टर, बॅनर आणि इतर ‘आयईसी’ साहित्य वापरून मोहिमांद्वारे जनजागृती वाढवावी, अशी सूचना केली. त्यांनी गाव आणि जिल्हा पातळीवर तळागाळातील वैद्यांच्या योगदानाची ओळख निर्माण करण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले आणि त्यांच्या कौशल्याचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यामुळे अधिकाधिक लोकांना आयुषचा फायदा घेता येईल आणि आयुष उपचार प्रणाली अधिक मजबूत करता येतील.
खासदार लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी टिप्पणी केली की, कोविड-19 साथीच्या काळात आयुर्वेदाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्यामुळे अनेकांचे जीव वाचविण्यासही मदत झाली असणार. पारंपरिक आरोग्यसेवेची उपलब्धता आणखी वाढवण्यासाठी त्यांनी नवीन आयुष कल्याण केंद्रे स्थापन करण्याची शिफारस केली.
खासदार डॉ. स्वामी सच्चिदानंद हरी साक्षी यांनी, आयुषचा विस्तार करण्यात यावा आणि आयुष उपचारांना प्रोत्साहन दिले जावे, असे समिति सदस्यांचे मत असल्याचे यावेळी सांगितले.
खासदार कृष्णा प्रसाद यांनी सांगितले की, आयुषचा विकास आणि विस्तार होत राहिला तरच विकसित भारताचा संकल्पही प्रत्यक्षात येण्यास मदत मिळू शकेल. त्यांनी आयुष सेवांची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि आयुषविषयी अनेक समजुती आणि गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
छत्तीसगडमधील कोरबा जमातीकडून होत असलेल्या कामावर प्रकाश टाकताना, ज्योत्स्ना चरणदास महंत यांनी त्यांच्या पारंपरिक उपचार पद्धतींचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी आणि आयुषविषयक अंतर्दृष्टीवर पद्धतशीर कार्य करण्यासाठी सर्व क्षेत्रांच्या सहभागाचा प्रस्ताव मांडला.
केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी समिती सदस्यांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांनी सादर केलेल्या विचारशील सूचना आणि अंतर्दृष्टीबद्दल कौतुक व्यक्त केले.




शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2158179)