आयुष मंत्रालय
आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाने बाल आरोग्यावरील 30 व्या राष्ट्रीय चर्चासत्राचे केले उद्घाटन
समृद्ध समाजाचा पाया म्हणजे सुदृढ बाल आरोग्य : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
Posted On:
18 AUG 2025 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2025
आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ (आरएव्ही) या स्वायत्त संस्थेने आज नवी दिल्लीतील लोधी रोड येथील स्कोप कॉम्प्लेक्स सभागृहात "आयुर्वेदाच्या माध्यमातून बालरोगशास्त्रातील आजार आणि आरोग्याचे व्यवस्थापन" या विषयावरील 30 व्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन केले. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आघाडीचे आयुर्वेद विद्वान, संशोधक, चिकित्सक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणून सर्वांगीण बालआरोग्य सेवा सुधारणे हा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनावर आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनावर आधारित, राष्ट्रीय चर्चासत्राच्या पहिल्या दिवशी झालेल्या चर्चेने, आयुर्वेदाचे ज्ञान बाल आरोग्यसेवेला नवीन आयाम देऊ शकते याची पुष्टी केली. काळाच्या कसोटीवर उतरलेल्या पद्धतींना आधुनिक वैज्ञानिक प्रमाणीकरणासह एकत्रित केल्याने केवळ प्रतिबंधात्मक बाल आरोग्यसेवेतच नव्हे तर उदयोन्मुख आरोग्य आव्हानांना समग्र पद्धतीने तोंड देण्यास मदत होईल, हे तज्ञांनी अधोरेखित केले. या ज्ञान एकत्रीकरणामुळे भविष्यातील सुदृढ आणि निरोगी पिढ्या घडवण्याचा पाया तयार होईल.
आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या लिखित संदेशात म्हटले आहे की, “ समृद्ध समाजाचा पाया म्हणून आयुर्वेदाने नेहमीच बाल आरोग्याला महत्त्व दिले आहे. हा राष्ट्रीय परिसंवाद बालकांमधील आजार व्यवस्थापनासह सर्वांगीण आरोग्य संवर्धनासाठी आयुर्वेदाचा समग्र दृष्टिकोन अधोरेखित करण्याचा योग्य वेळी हाती घेतलेला उपक्रम आहे. येथील चर्चासत्रे चिकित्सक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना समृद्ध करतील तसेच, आयुर्वेदाद्वारे बाल आरोग्यसेवेचा विकास साधतील.”
वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांनी योग आणि आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहचवल्याबद्दल पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि बाल आरोग्यावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल आरएव्हीचे कौतुक केले.
प्रा.(डॉ.) मंजुषा राजगोपाल यांनी यावेळी सांगितले की, आयुष मंत्रालयात स्थापनेपासूनच जनतेच्या विश्वासात प्रचंड वाढ झाली आहे. सरकारचे मजबूत पाठबळ आणि आयुष व्यावसायिकांच्या समर्पणाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आरएव्हीच्या संचालिका डॉ. वंदना सिरोहा यांनी आपल्या भाषणात "स्वस्थ बालक, स्वस्थ भारत" या दृष्टिकोनाला साकार करण्यासाठी चर्चासत्राचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आणि बाल कल्याणासाठी आयुर्वेदाची बालरोग शाखा - कौमारभृत्य, याच्या सर्वांगीण बालकल्याण दृष्टिकोनावर भर दिला.
या कार्यक्रमात बालरोग आयुर्वेदामधील प्रमुख कामगिरीचे प्रतीक असलेल्या स्मृतिचिन्ह आणि संशोधन पोस्टर्सचे अनावरण देखील करण्यात आले.
पहिल्या दिवसाची वैशिष्ट्ये :-
बालरोग आयुर्वेदामधील वैज्ञानिक पुराव्यावर आधारित दृष्टिकोनांवर प्रकाश टाकणारी सादरीकरणे
तरुण विद्वान आणि चिकित्सकांनी सादर केलेली नाविन्यपूर्ण संशोधनात्मक पोस्टर सत्रे
बाल आरोग्याच्या प्रतिबंधात्मक आणि संवर्धनात्मक दृष्टिकोनावर आधारित समाज सत्रे
या राष्ट्रीय उपक्रमात आयुर्वेदिक क्षेत्रातील प्राध्यापक, संशोधक, चिकित्सक आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला तसेच बाल आरोग्य सेवांचे भविष्य घडविण्यात आपले योगदान दिले.




निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2157672)