आयुष मंत्रालय
आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या वतीने आयुर्वेदाच्या माध्यमातून बालरोग शास्त्रातील आजार व आरोग्य व्यवस्थापन या विषयावर उद्यापासून 30 वा राष्ट्रीय परिसंवाद होणार
Posted On:
17 AUG 2025 11:21AM by PIB Mumbai
आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठामार्फत (आर ए व्ही ) आयुर्वेदाच्या माध्यमातून ‘बालरोग शास्त्रातील आजार व आरोग्य व्यवस्थापन' या विषयावर आधारित 30 वा राष्ट्रीय परिसंवाद उद्या 18 व 19 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्लीतील लोदी रोड, स्कोप कॉम्प्लेक्स सभागृहात आयोजित केला जाणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिसंवादात ख्यातनाम तज्ज्ञ, वैद्य, संशोधक व विद्यार्थी एकत्र येऊन पारंपारिक आयुर्वेदिक दृष्टिकोन आणि बाल आरोग्य व निरोगीपणाला प्रोत्साहन देण्यासाठी समकालीन पुराव्यावर आधारित पद्धतींवर चर्चा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी आरोग्यदायी समाज घडविण्यासाठी पारंपरिक औषधपद्धतींच्या महत्त्वावर भर दिला आहे. आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री व आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी बाल आरोग्याच्या सर्वांगीण संवर्धनासाठी आयुर्वेदाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.
परिसंवादाचे प्रमुख वैशिष्ट्ये :
- आयुर्वेदातील बालआरोग्य विषयक शास्त्रीय संशोधन निबंधांचे सादरीकरण.
- तरुण तज्ज्ञ व वैद्य यांचे पोस्टर सादरीकरण.
- बालकांमध्ये प्रतिबंधात्मक व संवर्धनात्मक आरोग्य सेवांवरील परस्परसंवादी सत्रे.
- सहभागींसाठी स्मृतिचिन्ह व परिसंवाद संच
- नोंदणीकृत प्रतिनिधींना क्रेडिट पॉइंट्स व सहभाग प्रमाणपत्रे
या परिसंवदात बालरोग आयुर्वेद क्षेत्रातील ज्ञानवृद्धी, नवकल्पना मांडणी आणि सहयोगी संशोधनाला चालना देण्यासाठी व्यापक प्रमाणात चर्चा होणार आहे.
या परिसंवादासाठी नोंदणी अनिवार्य असून, इच्छूकांनी : https://forms.gle/1dosxPcMsPC6zkRT7 या लिंकवर नोंदणी करावी.

***
सोनल तुपे/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2157279)