राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रात नांदेड सिटी टाउनशिपजवळच्या एका खड्ड्यात पुणे महानगरपालिकेशी संबंधित ड्रेनेजचे काम करताना ढिगारा कोसळून एकाचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाल्याच्या वृत्ताची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली

Posted On: 08 AUG 2025 4:38PM by PIB Mumbai

 

महाराष्ट्रातील नांदेड सिटी टाउनशिपजवळील एका खड्ड्यात पुणे महानगरपालिकेशी संबंधित ड्रेनेज लाईनचे काम करत असताना ढिगारा कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाल्या प्रकरणाच्या मीडिया रिपोर्टची (माध्यमांमध्ये प्रसारित झालेले वृत्त) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) स्वतःहून दखल घेतली आहे. ही घटना 4 जुलै 2025 रोजी घडल्याचे वृत्त आहे.

या बातमीतील मजकूर खरा असेल, तर पीडित व्यक्तीच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा गंभीर मुद्दा उपस्थित होतो, असे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे, आयोगाने  महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली असून, दोन आठवड्यांच्या आत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागितला आहे. या अहवालात जखमींच्या आरोग्याची स्थिती, तसेच पीडित व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई दिली असेल, तर त्याबाबतची माहिती  समाविष्ट असणे अपेक्षित आहे.

5 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाशित झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार, हे काम जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी, नदी सुधार प्रकल्पाचा एक भाग होते, ज्यामध्ये या भागात नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि ड्रेनेज लाईन्स बांधणे समाविष्ट आहे.

***

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2154501)
Read this release in: English , Urdu , Hindi