भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेशी संबंधित मृत्यू आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर

Posted On: 07 AUG 2025 9:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2025

 

महाराष्ट्रात 2018-2022 दरम्यान उष्णतेची लाट किंवा उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंची नवीनतम आकडेवारी गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी) कडून उपलब्ध करून दिलेली असून ती परिशिष्ट-1 मध्ये दिली आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) आणि राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीएमएफ) यांच्या माध्यमातून संसाधने उपलब्ध असतात. राज्यांकडून आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली, तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीएमएफ) अंतर्गत लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केंद्र सरकार त्याचा विचार करते.

भारतीय हवामान विभागाने देशभरातील विविध संशोधन केंद्रांच्या सहकार्याने निरिक्षण आणि पूर्वसूचना प्रणाली सुधारण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. उष्णतेच्या लाटांसह इतर अत्यंत प्रतिकूल हवामान स्थितीमध्ये जीवित आणि मालमत्तेचे नुकसान कमी करण्यात या प्रयत्नांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या उपक्रमांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे :

  • मोसमी आणि मासिक पूर्वानुमान जाहीर करणे, तसेच त्यानंतरच्या दिवसांसाठी उष्णतेची लाट आणि तापमानाविषयी विस्तारित पूर्वानुमान जाहीर करणे. या पूर्वानुमानाबद्दलची आणि हवामानाच्या अंदाजाविषयीची माहिती लोकांपर्यंत वेळेवर पोहोचू शकेल यासाठी ती विविध समाज माध्यमे आणि इतर व्यासपीठावरून देखील प्रसारित केली जाते.
  • राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थांना नियोजन करण्यात मदत करण्यासाठी भारतातील जिल्हा निहाय उष्णतेच्या लाटेसंदर्भात  अ‍ॅटलास.
  • भारताच्या उष्ण हवामान धोक्याचे विश्लेषण करणाऱ्या नकाशामध्ये तापमान, वाऱ्यांचे स्वरूप आणि आर्द्रता पातळी संबंधात दैनिक माहिती समाविष्ट आहे.
  • उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तसेच उन्हाळ्यात राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय उष्णतेच्या लाटेच्या तयारी संदर्भात बैठका आयोजित केल्या जातात आणि वेळोवेळी नियमित आढावा बैठका घेतल्या जातात.

हवामानाची ही माहिती केंद्र सरकारची मंत्रालये, राज्य सरकारे आणि स्थानिक सरकारी संस्थांसह सर्व संबंधितांना दिली जाते. याशिवाय, देशातील 23 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेवरील कृती आराखडे (HAPs) लागू करण्यात आले असून यात विशेष करून उष्णतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या विदर्भ आणि मराठवाडा विभागातील सर्व जिल्हे समाविष्ट आहेत. हे आराखडे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संबंधित राज्य सरकारांच्या सहकार्याने संयुक्तरित्या तयार केले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विकसित केलेली कॉमन अलर्ट प्रोटोकॉल (CAP) प्रणाली देखील वापरली जात असून त्याद्वारे भारतीय हवामान विभागाकडून इशारे आणि सूचना वेळेवर प्रसारित केल्या जातात.

भारतीय हवामान विभागाने, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होऊ शकते अशा देशातील 13 अत्यंत धोकादायक हवामानविषयक घटनांवर आधारित वेब-आधारित ऑनलाइन "हवामान धोका आणि असुरक्षितता अ‍ॅटलास" देखील तयार केला आहे. हा अ‍ॅटलास https://imdpune.gov.in/hazardatlas/abouthazard.html या लिंकवर उपलब्ध आहे. हा अ‍ॅटलास राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थांना धोका असलेले भाग (हॉटस्पॉट्स) ओळखण्यासाठी तसेच अत्यंत प्रतिकूल हवामान घटनांना तोंड देण्यासाठी नियोजन करण्यास आणि योग्य उपाययोजना करण्यास मदत करेल. हा ॲटलास हवामान बदल प्रतिरोधक पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. याशिवाय, भारतीय हवामान विभाग पुढील विविध माध्यमाद्वारे जनतेला हवामान विषयक माहिती प्रदान करतो:

  • मास मीडिया: आकाशवाणी/दूरचित्रवाणी, वृत्तपत्रे (एएम, एफएम, कम्युनिटी रेडिओ, खाजगी टीव्ही), प्रसार भारती आणि खाजगी चित्रवाणी वाहिन्या
  • साप्ताहिक आणि दैनिक हवामान व्हिडिओ
  • इंटरनेट (ईमेल), FTP
  • सार्वजनिक संकेतस्थळ (mausam.imd.gov.in)
  • भारतीय हवामान विभागाचे ॲप्स: मौसम, मेघदूत, दामिनी, रेन अलार्म
  • सोशल मीडिया: फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम, ब्लॉग
  1. एक्स : (ट्वीटर) https://twitter.com/Indiametdept 
  2. फेसबुक: https://www.facebook.com/India.Meteorological.Department/ 
  3. ब्लॉग: https://imdweather1875.wordpress.com/ 
  4. इंस्टाग्राम: https://www.instagram.com/mausam_nwfc 
  5. यूट्यूब: https://www.youtube.com/channel/UC_qxTReoq07UVARm87CuyQw 

2018-2022 मध्ये उष्णता / उष्माघात यामुळे झालेले मृत्यू :

 

S. No.

Year

Number of deaths

1

2018

128

2

2019

159

3

2020

56

4

2021

37

5

2022

90

स्रोत: संबंधित राज्यानी दिलेल्या आकडेवारीनुसार तसेच भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या अहवाल, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB), गृह मंत्रालय (MHA).

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही माहिती आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.

 

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2153940)
Read this release in: English , Urdu , Hindi