युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेतील भारताचा विजय हा देशाच्या क्रीडा नैपुण्याचा दाखला आहे -केंद्रीय क्रीडा मंत्री
डॉ.मनसुख मांडविया यांच्या हस्ते ‘फिडे’ महिला विश्वचषक 2025 च्या पदक विजेत्या दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांचा सत्कार
प्रविष्टि तिथि:
01 AUG 2025 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्ली येथे फिडे महिला विश्वचषक 2025 च्या पदक विजेत्या दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पीचा सत्कार केला. प्रतिभाशाली भारतीय बुद्धिबळपटू दिव्या आणि अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू यांनी जॉर्जियातील बटुमी येथे नुकत्याच संपलेल्या स्पर्धेत वर्चस्व राखत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली.


देशाची 88 वी ग्रँडमास्टर आणि चौथी भारतीय महिला ठरलेल्या दिव्या देशमुख हिचा डॉ.मांडविया यांनी व्यक्तिशः सत्कार केला.फिडे महिला विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद जिंकणारी ती पहिली भारतीय महिला तसेच सर्वात तरुण महिला ठरली आहे. कोनेरू हम्पी या समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाली.

कार्यक्रमात या दोघींना संबोधित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले,“तुमच्यासारखे ग्रँडमास्टर नवीन पिढीसाठी प्रेरणा ठरतील. जास्तीत जास्त युवा वर्ग खेळांमध्ये, विशेषतः बुद्धिबळसारख्या चातुर्याच्या खेळात रस घेतील. बुद्धिबळ ही भारताने जगाला दिलेल्या देणग्यांपैकी एक मानली जाते आणि प्राचीन काळापासून हा खेळ खेळला जात आहे. मला विश्वास आहे की, भारतातील अनेक मुली तुम्हा दोघींकडून प्रेरणा घेऊन जगात अभिमानास्पद कामगिरी करतील.”

बटुमी येथे 5–28 जुलै दरम्यान झालेल्या फिडे महिला विश्वचषक 2025 मध्ये भारताच्याच 19 वर्षीय दिव्या देशमुख आणि अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी यांच्यात ऐतिहासिक अंतिम फेरी पार पडली . प्रथमच दोन भारतीय महिला अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या आणि भारतासाठी हे पहिलेच महिला विश्वचषक स्पर्धेचे अजिंक्यपद आहे.

सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2151614)
आगंतुक पटल : 32