वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग क्षेत्राची स्पर्धात्मकता
Posted On:
01 AUG 2025 6:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025
सरकारने गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश, या सात राज्यांमध्ये प्रत्येकी एक ‘पीएम मित्र पार्क’ उभारण्यासाठी मान्यता दिली आहे.
अशा मित्र पार्कच्या प्रवेशद्वारापर्यंत बाह्य पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी 1,197.33 कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामे विविध राज्य सरकारांनी सुरू केली असून, या अंतर्गत आतापर्यंत 291.61 कोटी रुपये खर्च झाले आहेत. 399.26 रुपयांची कामे मंजुरी अथवा मंजुरीच्या विविध टप्प्यात आहेत. तेलंगणातील पीएम मित्र पार्क मध्ये औद्योगिक शेडचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, तर पीएम मित्र पार्क, महाराष्ट्र येथे 118 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत.
देशभरातील हातमाग कामगारांच्या कल्याणासाठी आणि हातमाग क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी सरकार पुढील योजना राबवत आहे:
1. राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम
2. कच्चा माल पुरवठा योजना
याशिवाय, देशभरातील हस्तकला क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि प्रोत्साहनासाठी, सरकार राष्ट्रीय हस्तकला विकास कार्यक्रम (NHDP) आणि व्यापक हस्तकला क्लस्टर विकास योजना (CHCDS) या दोन योजना देखील राबवत आहे.
सरकार समर्थ योजना (वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी क्षमता विकास योजना) राबवत आहे. समर्थ योजने अंतर्गत 24.07.2025 पर्यंत हातमाग व हस्तकला ई. पारंपरिक क्षेत्रासह अन्य क्षेत्रांमधील एकूण 4,57,724 लाभार्थ्यांना प्रशिक्षण (उत्तीर्ण) देण्यात आले. हातमाग कामगारांना समर्थ (SAMARTH) योजने अंतर्गत विणकर सेवा केंद्रामार्फत विणकाम, रंगकाम/छपाई आणि डिझायनिंग इत्यादी तांत्रिक क्षेत्रात कौशल्य वृद्धी प्रशिक्षणही दिले जाते.
ई-कॉमर्सचे फायदे देण्यासाठी, विणकर आणि कारागिरांना कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय थेट खरेदीदार/ग्राहकांना हातमाग आणि हस्तकला उत्पादनांचे ऑनलाइन मार्केटिंग करता यावे यासाठी एक ई-कॉमर्स पोर्टल (indiahandmade.com) विकसित करण्यात आले आहे.
वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2151487)