श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ई-श्रम पोर्टलवर 30.95 कोटींहून अधिक असंघटित कामगारांची नोंदणी

Posted On: 28 JUL 2025 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2025

 

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी ई-श्रम पोर्टल (eshram.gov.in) सुरू केले. या पोर्टलचा उद्देश आधारशी संलग्न असंघटित कामगारांचा सर्व समावेशक राष्ट्रीय डेटाबेस तयार करणे हा आहे. ई-श्रम पोर्टलचा वापर असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी आणि त्यांना स्वयंघोषणेनुसार युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच सार्वत्रिक खाते क्रमांक (UAN) प्रदान करण्यासाठी केला जातो.

22 जुलै 2025 पर्यंत 30.95 कोटींहून अधिक असंघटित कामगारांनी ई- पोर्टलवर नोंदणी केली आहे.

2024-25 च्या अर्थसंकल्पीय घोषणेनुसार ई-श्रम पोर्टलला असंघटित कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देणारे “वन स्टॉप सोल्युशन” म्हणून विकसित करण्याच्या दृष्टिकोनाला अनुसरून, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 21 ऑक्टोबर 2024 रोजी “ई-श्रम वन स्टॉप सोल्युशन”चा प्रारंभ केला. ई-श्रम - "वन -स्टॉप-सोल्यूशन" मध्ये एकाच पोर्टलवर म्हणजेच ई-श्रमवर विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचे एकत्रीकरण केले आहे. ई-श्रमवर नोंदणीकृत असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्यासाठी  आणि त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या लाभांची माहिती पोर्टलवर पाहण्यासाठी सक्षम करतो.

सध्या, केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि विभागांच्या चौदा (14) योजना ई-श्रम कार्डधारकांना सामाजिक सुरक्षा, विमा किंवा कौशल्य विकास कार्यक्रमांचे फायदे मिळवून देण्यासाठी ई-श्रमशी एकत्रित करण्यात आल्या आहेत किंवा जोडण्यात आल्या आहेत.

ई-श्रम पोर्टल हे प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजना (पीएम-एसवायएम), नॅशनल करिअर सर्व्हिस (एनसीएस), स्किल इंडिया डिजिटल हब (एसआयडीएच), युनिफाइड मोबाइल ॲप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (उमंग), डिजिटल लॉकर (डिजीलॉकर), मायस्कीम आणि ओपन गव्हर्नमेंट डेटा प्लॅटफॉर्म (ओजीडी) यांच्यासोबत देखील जोडण्यात  आली आहे.

श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2149515)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil